प्रतिनिधी
अनुसूचित जाती व जमातीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दोन चित्ररथांच्या (एलईडी डिस्प्ले व्हॅन) माध्यमातून जिल्ह्यात ग्रामीण भागातील सुमारे दीडशे गावात देण्यात येत आहे.
अनुसूचित जाती व जमातीच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर आधारित विविध विषयांवर लघुचित्रफीती तयार करण्यात आल्या आहेत. चित्ररथावरील एलईडी स्क्रीनवरुन या लघुचित्रफीती, ग्राफीक्स स्वरुपात योजनांची माहिती तसेच योजनांवरील आधारित यशकथा प्रदर्शित करण्यात येत आहेत. तसेच वाहनावरही योजनांची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ही मोहीम राबवण्यात येत असून मोहिमेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे सहकार्य लाभले आहे.
आतापर्यंत पुणे शहरात कोंढवे धावडे, किरकटवाडी, खडकवासला, खेड शिवापूर, बिबवेवाडी, शंकर महाराज वसाहत, तळजाई वसाहत, सिद्धार्थ वसाहत, अंबील ओढा, कासेवाडी, रामटेकडी, पर्वती दर्शन, पर्वती पायथा, दत्तवाडी, दांडेकर पूल, शिवदर्शन वसाहत, हवेली तालुक्यात वडकी, कदम वाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, मांजरी खुर्द, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, हिंगणगाव, पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी बारामती तालुक्यातील निंबूत, वाघळवाडी, वाणेवाडी, करंजे, मुरुम, होळ, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे खुर्द, कोऱ्हाळे बुद्रुक, थोपटेवाडी, लाटे माळवाडी, कांबळेश्वर, सांगवी, पवईमाळ, पणदरे, माळेगाव बु., खांडज, नीरा वागज, मेखळी, सोनगाव या गावांमध्ये या व्हॅनद्वारे योजनांची प्रसिद्धी करण्यात आली आहे.