मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

माण तालुक्यातील दहिवडी येथील गटारांच्या कामास नगरपंचायत कडून सुरुवात

mnewsmarathi 24 Mar 2023 1 मिनिट वाचन 9,358 वाचन

प्रतिनिधी कोमल काळे

                      माण तालुक्यातील दहिवडी येथील गटारांच्या नूतनीकरणाच्या कामास २२ मार्च २०२३ रोजी नगरपंचायतच्या वतीने सुरुवात झालेली आहे. अनेक दिवांपासून रखडलेले हे काम राष्ट्रवादी नेते मा. प्रभाकरजी देशमुख तसेच दहिवडी नगराध्यक्ष मा. सागर पोळ आणि नगरसेवक मा. सुरेन्द्र मोरे यांच्या पुढाकाराखाली हे काम सुरू करण्यात आले आहे.

                      स्थानिक नागरिकांना त्रास न होता हे काम करण्याचे आश्वासन देऊन हे काम पूर्ण होईल असे आश्वासन मा. नगराध्यक्षांनी दिले आहे. दहिवडी बाजार पटांगण ते सिध्दनाथ मंदीर येथून कामास सुरुवात झालेली आहे. याबरोबरच गावातील कच्च्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती नगरपंचायतीने दिलेली आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi