• Home
  • इतर
  • लाटे येथील निरा नदीचे बंधन्यावरिल बर्गे चोरणारी टोळी जेरबंद
Image

लाटे येथील निरा नदीचे बंधन्यावरिल बर्गे चोरणारी टोळी जेरबंद

प्रतिनिधी

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक- १७/१०/२०२२ ते २३ / १० / २०२२ रोजी मौजे लाटे ता बारामती गावचे हददीत निरा नदीचे बंधान्याचे जवळील पाटबंधारे विभागाचे चौकीचे मागील बाजुचे मोकळे मैदानातून बंधायावरील ५७०००/- रू किंमतीचे ४० लांखंडी बर्गे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेलेबाबत श्री राजेंद्र कोंडीवा कदम धंदा नोकरी वडगाव पाटबंधारे शाखा रा कांबळेश्वर ता बारामती जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३५९ / २०२२ भादवि ३७९ प्रमाणे दि. २४/१०/२०२२ रोजी गुन्हा दाखल झालेला होता.

सदर गुन्हयाचे तपासात बंधाऱ्याचे वर्गे चोरी झालेबाबत माहीती मिळणे कामी खुप मोठया प्रमाणात सी. सी.टी.व्ही कॅमेरांची पडताळणी करून तांत्रिक माहीती व गोपनीय माहीतीच्या आधारे संशयित आरोपी निष्पन्न झालेने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे स. पो. नि. सोमनाथ लांडे व पोलीस तपास पथक यांनी संबंधित संशईत आरोपी नामे

१) गणेश शंकर जाधव रा निरा ता पुरंदर जि पुणे यास निरा येथुन ताब्यात घेऊन त्यांचेकडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने चौकशी केला असता इतर साथिदार

२ ) शुभम किसण बरकडे रा लोणंद ता खंडाळा जि सातारा

३) विकास बाजीराव गायकवाड र बोरीऐंदी ता दौंड जि पुणे

४) विशाल चव्हाण रा निरा पुर्ण नाव पत्ता माहीत नाही

५) शशांक सोनवणे रा निरा पुर्ण नाव पत्ता माहीती नाही

६) आर्यन माचरे र पाडेगाव ता खंडाळा पुर्ण नाव पत्ता माहीती नाही

(७) शुभम माचरे र पाडेगाव ता खंडाळा पुर्ण नाव पत्ता माहीती नाही

तसेच गुन्हयातील चोरीचा माल घेणारा अभिजित कोंडीबा भोसले रा यवत ता दौंड जि पुणे यांचेसोबत लाटे ता बारामती येथील निरा नदीचे पात्रातील. बंधाऱ्याचे वर्गे चोरी केलेचे कबुल केलने सदर गुन्हयाचे तपासकामी आ.क.१,२,३,८ आरोपींना अटक करण्यात आलेली असुन सदर गुन्हयात वापरलेले वाहन टाटा कंपनीचा ४०७ मॉडलचा टॅम्पो एम एच १२ सी टी ९००० हा जप्त करण्यात आला असुन गुन्हयात चोरी गेलेला १००००/- रू किमतीचे ५ लोखंडी बर्गे तप्त करण्यात आले आहेत

सदरची कामगिरी ही मा. श्री. डॉ. अभिनव देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री. मिलिंद मोहिते सो अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. श्री. गणेश इंगळे सो उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी श्री सोमनाथ लांडे (सहा पोलीस निरीक्षक) तसेच पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, सहा फौज महेश पन्हाळे, पो. हवा. महेंद्र फणसे, पो.हवा. रमेश नागटिळक, पो.हवा. सुर्यकांत कुलकर्णी, पो.ना. हिरामन खोमणे, पो.ना, भाउसाहेब मारकड, पो.शि.पोपट नाळे, अमोल भुजबळ, किंसन ताडगे, आबा जाधव, विलास ओमासे चा.पो.ना. विजय शेंडकर होमगार्ड निलेश खामगळ, वैभव कुंभार यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा फौज. महेश पन्हाळे, हे करीत आहेत.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025