वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार
वडगाव निंबाळकर ता.बारामती येथे क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९७ जयंतीनिमित्त दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी श्री संत सावता माळी देवस्थान प्रांगण वडगाव निंबाळकर येथे प्रबोधन एकपात्री नाट्य परिषद पुणे निर्मित मी महात्मा फुले बोलतोय हे नाट्य सादर करण्यात आले. याचे लेखक व सादर करते नट श्रेष्ठ कुमार आहेर यांनी ह्या नाट्यचे प्रकाक्षित व त्या नाट्य चे लेखन त्यांचे स्वतःचे आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ७.३०ते ९.३० वाजेपर्यंत पार पडला. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव निमित्त कार्यक्रमाचे आयोजण केले होते .या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा पाहण्यासाठी प्रतिसाद ही चांगला मिळाला यामध्ये महिला, पुरुष व लहान मुले व युवा पिढीचा चांगला सहभाग होता .या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने या नाट्य कार्यक्रमातून एकोप्याचे संदेश देण्यात आले .
यामध्ये क्रांतीसुर्य, ज्ञानचक्ष्यु, थोर विचारवंत , स्त्री शिक्षणाचे जनक ,अस्पृश्यता व जातीव्यवस्था निर्मुनल प्रणेते ,सत्यशोधक समाज संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता .
महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त ११ एप्रिल रोजी वडगाव निंबाळकर येथे श्री संत सावता माळी देवस्थान प्रांगण या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती यांच्या आयोजित प्रतिमेचेपूजन व जयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात आले आहे . या कार्यक्रमाचे आयोजन वडगाव निंबाळकर मधील महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती यांनी व तरुणांनी यामध्ये पुढाकार घेऊन चांगल्या प्रकारे व उत्साहात जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे .