• Home
  • माझा जिल्हा
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बारामती उप विभागात विशेष मोहीम
Image

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बारामती उप विभागात विशेष मोहीम

प्रतिनिधी

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बारामती उप विभागात ३१ मे पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी उप विभागीय कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी एम किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास २ हजार रुपये हप्त्याप्रमाणे प्रती वर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी कृषि विभागासह गावातील पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवून लाभार्थ्यांची जास्तीत जास्त बँक खाती आधार क्रमांकाशी जोडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत १४ व्या हप्त्याचा लाभ माहे मे किंवा जून मध्ये जमा होणार असून केंद्र शासनाने १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. बारामती उप विभागात बारामती तालुक्यात ८ हजार ८५५, दौंड तालुक्यात ९ हजार ६६९, पुरंदर तालुक्यात ८ हजार २०२ आणि इंदापूर तालुक्यात १० हजार ३११ अशी एकूण ३७ हजार ३७ लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात १४ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांक इत्यादीच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडीया पोस्ट पेमेंट बँकत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थीना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही.

पी. एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थीची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून तो आधार क्रमांकास जोडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक कार्यालयास उप विभागातील गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थीना संपर्क करून आयपीपीबी मध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने ३१ मे २०२३ अखेर गाव पातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे.

खाते उघडण्यासाठी लाभार्थीनी फक्त आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. कृषि विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमध्ये बारामती उप विभागातील सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषि विभागातून करण्यात आले आहे.

Releated Posts

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026