• Home
  • माझा जिल्हा
  • भोर उपविभागाअंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे ३० मे आयोजन
Image

भोर उपविभागाअंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे ३० मे आयोजन

प्रतिनिधी

भोर उपविभागाअंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे कुंभारकर लॉन्स मंगल कार्यालय नसरापूर आणि गंगोत्री सभागृह भोर येथे ३० मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.

वेळू, नसरापूर आणि किकवी या मंडळातील गावांसाठी कुंभारकर लॉन्स मंगल कार्यालय, नसरापूर आणि भोर, भोलावडे, संगमनेर, आंबवडे व निघूडघर या मंडळातील गावांसाठी गंगोत्री सभागृह भोर येथे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानात उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात, रहिवासी, प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र, शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे, नाव वाढविणे,जीर्ण किंवा खराब शिधापत्रिका बदलणे, नविन शिधापत्रिका अर्ज स्विकृती, सामाजिक विशेष सहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत विधवा, दीर्घकालीन आजार, दिव्यांगासाठीच्या योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, नवीन मतदार नोंदणी करणे, नवीन आधारकार्ड काढणे किंवा दुरुस्ती करणे, दिव्यांगासाठी आधार कार्ड नोंदणी करणे आदी सेवा देण्यात येणार आहेत.

घरगुती नवीन वीज कनेक्शन, कोविड प्रतिबंधक लसीकरण, एस.टी. पास ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगासाठी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र-अर्ज स्वीकृती, पंचायत समितीअंतर्गत विविध विभाग,कृषी,भुमी अभिलेख, योजना,आरोग्य, पोस्ट, वन, लाभ, राज्य परिवहन महामंडळ, पशुसंवर्धन, नगरविकास,पाटबंधारे विभागाच्या योजना व सेवेचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026