• Home
  • क्राईम
  • होळ ८ फाटा येथे जेवण न दिल्याच्या कारणावरून चौघाणकडून एका व्यक्तीस जबर मारहाण
Image

होळ ८ फाटा येथे जेवण न दिल्याच्या कारणावरून चौघाणकडून एका व्यक्तीस जबर मारहाण

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती ! होळ ८ फाटा येथे जेवण न दिल्याच्या कारणावरून चौघाणकडून एका व्यक्तीस जबर मारहाण वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.

दि. २७/०५/२०२३ रोजी रात्री १०.०० वा. सुमारास होळ ता. बारामती जि. पुणे गावच्या हद्दीत आठ फाटा कांबळे वस्ती येथे यशवंत कांबळे यांच्या घराच्या जवळ आले व फिर्यादी देविदास कांबळे यांना आरोपी निलेश कांबळे, सुधीर जावळे ,भाऊ साळवे, शेखर कांबळे , यांना जेवण न दिल्याच्या कारणावरून यातील आरोपी निलेश कांबळे यांनी त्याच्या हातातील दगड फिर्यादी देविदास कांबळे यांच्या डोक्यात मारून व सुधीर कांबळे यांनी त्याच्या हातातील लोखंडी गजाने फिर्यादी यांच्या उजव्या हातावर आणि डोक्यात मारून भाऊ साळवे यांनी लोखंडी कोयत्याने मारून तसेच शेखर कांबळे यांनी त्याच्या हातातील काठीने फिर्यादी यांच्या तोंडावर, पाठीवर ,डाव्या हाताच्या मनगटावर दोन्ही पायावर मारून फिर्यादीस गंभीर जखमी करून शिवीगाळी, दमदाटी करून जीव मारण्याची धमकी दिली आहे. फिर्यादी देविदास कांबळे यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये दि. ३०/०५/२०२३ रोजी फिर्याद दाखल करून कलम ३२६,३२४,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे .

 पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पो .ना देवकर हे करीत आहेत.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026