मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

मल्टी जिनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. या कंपनीच्या कॉर्पोरेट ऑफिसचे स्थलांतरण गुरुवार दि. 1 जून 2023 रोजी पुण्यातील कात्रज येथे करण्यात आले.

mnewsmarathi 04 Jun 2023 1 मिनिट वाचन 8,812 वाचन

प्रतिनिधी

 

प्रशिक्षण व नोकरी या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून संपूर्ण भारतात नावलौकिक मिळवणाऱ्या मल्टी जिनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. या कंपनीच्या कॉर्पोरेट ऑफिसचे स्थलांतरण गुरुवार दि. 1 जून 2023 रोजी पुण्यातील कात्रज येथे करण्यात आले.

या नवीन ऑफिस चे उदघाटन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास कात्रज युवा नेते स्वराज बाबर, नगरसेवक श्री. युवराज बेलदरे, पुणे केंब्रिज स्कूल चेअरमन चंद्रकांत कुंजीर सर, मोरया नर्सिंग होमच्या डॉ. सुचेता भालेराव, खडकवासला राष्ट्रवादी सरचिटणीस विलासराव भनगे, रिटायर्ड पोलीस अधिकारी काशिनाथ सुके, उद्योजक नाना सरपाले, उद्योजक संतोष पासलकर, रिको कंपनीच्या डायरेक्टर स्वाती कोळते, मौलाना साजिद साहेब, हाफीज शकील साहेब तसेच पुण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

मल्टी जिनियस कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर फिरोज शेख यांनी आपल्या उच्च शिक्षण आणि परदेशातील अनुभव, कौशल्याने फक्त साडे तीन वर्षांत हजारो लोकांना करिअर मार्गदर्शन केले व बऱ्याच लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. या कंपनीचे महाराष्ट्रातील विविध शहरांत 4 ऑफिसेस आहेत. श्री. कुंभार साहेब आणि इतर मान्यवरांनी या यशस्वी कामगिरीबद्दल फिरोज शेख व अमन शेख यांचे कौतुक केले तसेच कंपनीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कंपनीतर्फे आपल्या देशातील तरुण, बेरोजगारांना प्रशिक्षण, नोकरी व्यतिरिक्त व्यवसाय मार्गदर्शन सुद्धा सुरू करण्यात येणार असल्याचे फिरोज शेख यांनी सांगीतले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi