• Home
  • माझा जिल्हा
  • संत निरंकारी मिशन मार्फत संपूर्ण भारतातील १५ पर्वतीय स्थळांवर विश्व पर्यावरण दिवसाचे आयोजन…!
Image

संत निरंकारी मिशन मार्फत संपूर्ण भारतातील १५ पर्वतीय स्थळांवर विश्व पर्यावरण दिवसाचे आयोजन…!

प्रतिनिधी

            निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन आशीर्वादाने वैश्विक प्रदूषण व ग्लोबल वार्मिंगच्या संकटापासून जगाला वाचवण्यासाठी संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत संयुक्त राष्ट्रांची थीम ‘बीट प्लास्टिक पोल्युशन’ या विषयाला अनुसरुन दिनांक ५ जून, २०२३, सोमवार रोजी विश्व पर्यावरण दिवस’* दिनी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

            या स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रमासाठी संत निरंकारी मिशन द्वारे संपूर्ण भारतातील १५ पर्वतीय पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली आहे. या मध्ये पुणे जिल्ह्यातील लोणावळा, खंडाळा तसेच प्रामुख्याने महाराष्ट्रातील महाबळेश्वर, पांचगनी, पन्हाळा, उत्तराखंड राज्यातील मसूरी, ऋषिकेश, लैंसडाउन, नैनीताल; हिमाचल प्रदेशमधील शिमला शहर, मनाली, धर्मशाला; गुजरातमधील सापुतारा, सिक्किममधील जोरेथांग शहर आणि कर्नाटकमधील नंदी हिल्स अशा विविध पर्वतीय स्थळांचा समावेश आहे. सकाळी ८.३० वाजता या अभियानाला सुरवात केली जाईल. कार्यक्रमाचा शुभारंभ प्रार्थनेद्वारे केला जाईल ज्यामध्ये सर्व स्वयंसेवक सहभागी होतील व कार्यक्रमाचा समारोप दुपारी १.०० च्या दरम्याने केला जाईल.

            संत निरंकारी मिशन २०१४ पासूनच संयुक्त राष्ट्रांच्या यूनाइटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम या पर्यावरण कार्यक्रमाच्या थीमनुसार ‘विश्व पर्यावरण दिवस’ साजरा करत आले आहे.स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सदगुरु माताजींच्या पावन आशीर्वादाने नुकतेच दिनांक २६ फेब्रुवारी रोजी ‘अमृत परियोजना’ या योजनेचे आयोजन संपूर्ण भारतवर्षात करण्यात आले ज्याचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन करण्यात आले. ही परियोजना अधिक गतिमान करण्यासाठी संत निरंकारी मिशनकडून १०० पेक्षा अधिक वाटर बॉडीजवर *‘जल निकाय स्वच्छता अभियान’* दिनांक ४ व ५ जून २०२३, रोजी मिशनच्या देशभरातील विविध शाखांमार्फत आपापल्या स्तरावर राबविले जाईल.

            पर्यावरण संकटाचा सामना करताना प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी जेव्हा अवघे विश्व एक साथ एका मंचावर उभे राहिले असताना संत निरंकारी सेवादलाचे हजारो स्वयंसेवक आपल्या खाकी गणवेषामध्ये तर संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक निळे टी-शर्ट व टोपी घालून स्वच्छतेसाठी सेवारत राहतील. याबरोबरच अन्य निरंकारी भक्तगण व संबंधित शहरातील नागरीक मिळून वृक्षारोपण आणि स्वच्छतेचे मेगा अभियान राबवतील ज्यायोगे प्रकृतीला स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर बनविले जाऊ शकेल.

            संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन चे सचिव श्री.जोगिंदर सुखीजा यांनी सांगितले, की मिशनचे युवा स्वयंसेवक ‘बीट प्लास्टिक पोल्युशन’ या थीमवर पथनाट्य सादर करतील त्यातून जनसामान्यांना पर्यावरण संकट याविषयी जागरुक करतील. नो प्लास्टिक यूज, बीट एयर पोल्यूशन, स्वच्छता आणि वृक्षारोपण आदि संदेशांवर भर देण्यासाठी मिशनचे स्वयंसेवक विविध घोषणाफलक व बॅनर हातात घेऊन मानवी साखळी तयार करतील. याशिवाय हिल स्टेशनवर लोकांना स्वच्छतेच्या प्रति जागरुक करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटपही करण्यात येईल. कार्यक्रमात भाग घेणारे सर्वजण ‘पर्यावरण संरक्षण’ शपथ देखील घेतील.

            संत निरंकारी मिशन निरंतर आध्यात्मिक जागृतीबरोबरच मानवतेच्या सेवेमध्ये स्वत:ला सातत्याने समर्पित करत आले. या सेवांमध्ये मुख्यतः वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरांचे आयोजन यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त मिशन समाजाच्या उत्थानासाठी महिला सशक्तिकरण व युवाशक्तीच्या उर्जेला सकारात्मक मागर्दशन करण्यासाठी अनेक कल्याणकारी परियोजना राबवित आहे. अशा प्रकारच्या निःस्वार्थ सेवा केल्याबद्दल मिशनला अनेक राज्यांकडून सन्मानित करण्यात आले आहे. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली या पारमार्थिक सेवा मिशनमार्फत अविरतपणे केल्या जात आहेत. निश्चितपणे वेळोवेळी आयोजित केली जाणारी अशा प्रकारची अभियाने प्रकृतीचे संतुलन कायम ठेवण्यासाठी निश्चितच एक सार्थक पाऊल असून त्यामध्ये संत निरंकारी मिशन आपली महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026