• Home
  • माझा जिल्हा
  • समाजाने ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे- मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकांत देशपांडे
Image

समाजाने ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे- मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकांत देशपांडे

प्रतिनिधी

लोकशाही प्रक्रीया अर्थपूर्ण होण्यासाठी समाजाने ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या समस्या जाणून घेत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणे गरजचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकांत देशपांडे यांनी केले.

पुण्यातील ‘युतक’ या संस्थेतर्फे आयोजित ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या अभिमान पदयात्रेत यांनी सहभाग घेऊन डॉ.देशपांडे यांनी उपस्थितांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी प्र.निवडणूक उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के आणि ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदाय तसेच युतक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.देशपांडे म्हणाले, लोकशाही प्रक्रीयेत प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाचे सदस्य पदयात्रेत सहभागी होऊन आपल्या समस्या समाजासमोर मांडत असतांना समाजाकडूनही त्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. त्यांचे शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नाकडेही समाजाने लक्ष देणे गरजेचे आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रीयेत समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी होणे गरजचे आहे, असे त्यांनी सांगितले.

संभाजीराजे उद्यान – डेक्कन बस स्थानक, गूड लक चौक – एफसी गेट – शिरोळे रोड – संभाजीराजे उद्यान या मार्गावर रॅलीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने मतदार नोंदणीचेदेखील आवाहन करण्यात आले. रॅलीच्या निमित्ताने ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या सदस्यांनी आपल्या समस्या समाजासमोर ठेवल्या.

Releated Posts

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026