• Home
  • माझा जिल्हा
  • ‘हर घर तिरंगा २.०’ अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ध्वज टपाल कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध
Image

‘हर घर तिरंगा २.०’ अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ध्वज टपाल कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध

प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित या वर्षीही ‘हर घर तिरंगा २.०’ अभियान राबविण्यात येत असून या अभियानाअंतर्गत नागरिकांना राष्ट्रीय ध्वज उपलब्ध होण्यासाठी नजीकच्या टपाल कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत, अशी माहिती बारामती डाक विभागाचे अधीक्षक दिलीप सर्जेराव यांनी दिली आहे.

स्वातंत्र्यसंग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक यांच्या आठवणी, देशभक्तीची भावना जनमानसात कायम रुजावी या उद्देशाने गतवर्षी ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले होते. या अभियानास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. देशाबद्दल असलेला अभिमान आणि स्वातंत्र्यदिनाचे स्मरण करण्यासाठी यावर्षी ‘हर घर तिरंगा २.०’ अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाअंतर्गत राष्ट्रीय ध्वजांची विक्री आणि वितरण टपाल कार्यालयातून करण्यात येत असून जवळच्या टपाल कार्यालयात २५ रुपयांत राष्ट्रीय ध्वज विक्रीकरीता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना www.epostoffice.gov.in या संकेतस्थळावर राष्ट्रीय ध्वज ऑनलाइन खरेदीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

कार्यालयाच्या sposbaramati@gmail.com या ई-मेल पत्त्यावर राष्ट्रीय ध्वज मागणीबाबत नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी ९८३४५१५३९२, ९१४५५१०८९४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. शासकीय कार्यालये, खासगी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थानी राष्ट्रीय ध्वज मागणीसाठी नजीकच्या डाक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. सर्जेराव यांनी केले आहे.

Releated Posts

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026