मुख्य मजकुरावर जा
Monday, 31 August 2026

विद्या प्रतिष्ठान येथे नवमतदार जनजागृती व मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन*

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
August 19, 2023 1 मिनिट वाचन 8,508 वाचन

 तहसिल कार्यालयाच्यावतीने विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे नवमतदार जनजागृती व मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मंगल गावडे, डॉ. मंगेश कोळपकर, डॉ. राहुल तोडमल, प्राचार्य डॉ. भरत शिंदे आदी उपस्थित होते.

विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे आज राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटनप्रसंगी तहसिल कार्यालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवीन मतदारांना ५०० नमुना क्र. ६ चे फॉर्म वाटप करण्यात आले. तसेच नवीन मतदारांची ऑनलाईन नोंदणीही करण्यात आली.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख