प्रतिनिधी.
चौधरवाडी गावावर दुष्काळी परिस्थितीचे सावट उत्तरे बाजूस मूर्टी मोढवे या गावांचा भाग पुरंदर उपसा सिंचन योजनेखाली आलेला आहे. तर करंजे मगरवाडी वाकी हा भाग निरा डावा कालव्याच्या नजीक आहे .तरी चौधरवाडी गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर निरा डावा कालवा असल्यामुळे पाण्याच्या तीन स्कीमा करून ही सुद्धा पाणी व्यवस्थित मिळत नाही.त्यात निरा ङावा कालवा अस्तरीकरण चे सावट शेतकर्यापुढे आहे.शेतकऱ्यांना पाणी कमी मिळाल्यामुळे आर्थिक फटका बसत असतो. तरी चौधरवाडी ग्रामस्थांचे आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी लक्ष घालून चौधरवाडी गावाला गुंजवणीचं किंवा जेऊर मांडकीच्या धरर्तीवर स्कीम बनवून पाण्याचे नियोजन करावे. जर चौधरवाडी परिसरात पाणी आले तर जवळपास पाचशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.आशी मागणी सोमेश्वर सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर युवा कार्यकर्ते सुखदेवराव शिंदे,प्रदिप भापकर चेअरमन सोमेश्वर वि.का.सो.चौधरवाङी,चारूदास शिंदे,नवनाथ चौधरी,पोपटराव चौधरी यांनी केली आहे.*