आमराई मध्ये दारू गाळणाऱ्या वर कारवाई

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे

बारामती शहरातील मध्यवर्ती भाग चंद्रमणी नगर अमराई या ठिकाणी अवैध हद्दपट्टी दारू तयार केली जाते असे वारंवार लोकांचे फोन पोलीस स्टेशनला येत होते. त्या अनुषंगाने आज पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे कुलदीप संकपाळ दशरथ कोळेकर दशरथ इंगोले तुषार चव्हाण शाहू राणे सागर जामदार यांना सदर ठिकाणी पाच वाजण्याच्या दरम्यान छापा मारण्याची आदेश दिले त्यावेळी हिराबाई लाला गव्हाळे लता दिलीप गव्हाळे अर्जुन गव्हाळे प्रशांत गव्हाळे हे आपल्या आपल्या राहता घराच्या आडोशाला घातक नवसागर काळा गुळ कुजलेले पदार्थ वापरून हातभट्टी तयार दारू करत असताना मिळून आले .

सदर ठिकाणी पोलिसांनी 200 लिटर मापाचे 11 प्लास्टिक बॅरल एक 200 लिटर मापाचा लोखंडी बॅरल व त्यातील अठराशे लिटर रसायन हे जागीच नाश केले तसेच ग्राहकांना विक्री करत असणारे 35 लिटर गावठी तयार दारू त्या ठिकाणावरून जप्त केली त्या ठिकाणावरून 30770 रुपयाचा मुद्देमाल जागेवर नाश केला व दारू जप्त केली. सगळ्या आरोपींच्यावर भादवी कलम 328 व दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

हे सर्व आरोपी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील दारू विक्रेते असून अवैध दारू विक्री बनवण्यामध्ये वयस्कर महिला विकलांग यांना पुढे करून पोलिसांच्या अटक करताना कायदेशीर अडचण व्हावी म्हणून जाणीवपूर्वक आरोपीकडून या प्रकारची पद्धत वापरली जात आहे. परंतु यातील मास्टर माईंड लोकांच्यावर सुद्धा आता पोलीस कारवाई करणार आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे पोलीस उपाधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलिसांनी केलेली आहे.

कारवाई केलेल्या चा व्हिडिओ