• Home
  • इतर
  • पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था सातारा या संस्थेच्या सल्लागारपदी बारामती मधून श्री.अविनाश सावंत यांची तर पुरंदर मधून श्री.शिवाजीराव काकडे देशमुख यांची निवड…
Image

पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्था सातारा या संस्थेच्या सल्लागारपदी बारामती मधून श्री.अविनाश सावंत यांची तर पुरंदर मधून श्री.शिवाजीराव काकडे देशमुख यांची निवड…

प्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर व कोल्हापूर तसेच कोकण विभागातील रायगड जिल्हा असे सहा जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या, पुणे विभाग माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेच्या सल्लागारपदी बारामती तालुक्यातील धों.आ.सातव (कारभारी) हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे कार्यरत असलेले , बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष श्री.अविनाश सावंत सर यांची तर पुरंदर तालुक्यामधून श्री बा.सा.काकडे -देशमुख विद्यालय पिंपरे ता.पुरंदर येथे कार्यरत असलेले श्री.शिवाजी काकडे यांची संस्थेच्या सल्लागारपदी निवड झाल्याचे पत्र संस्थेचे मार्गदर्शक श्री.एस.पी.जगताप सर यांनी त्यांना दिले.
तीन हजार सभासद व सुमारे ५० कोटी रुपये भाग भांडवल असलेल्या या माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेची स्थापना १९७६ मध्ये झालेली असून, संस्थेला स्थापनेपासून ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे सन २०२२-२३ या अहवाल सालात संस्थेला सुमारे चार कोटी रुपये नफा झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सहकारी पतसंस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक असून सातारा जिल्ह्यातील श्री.गुलाबसिंग कदम यांच्या नेतृत्वाखाली संस्था आदर्श वाटचाल करीत आहे.
यापुढील काळात संस्थेची सभासद संख्या वाढवणे, सभासदांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना राबवणे, बारामती इंदापूर, पुरंदर , दौंड येथे नवीन शाखा सुरू करणे अशा गोष्टींसाठी प्रयत्न करणार असल्याचे संस्थेचे नवनिर्वाचित सल्लागार यांनी सांगितले. या निवडीबद्दल श्री.अविनाश सावंत यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.सदाशिव (बापूजी) सातव, शाळा समितीचे अध्यक्ष दत्तात्रय (काकाजी) सातव, बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक संभाजीनाना होळकर ,बारामती सहकारी बँकेचे चेअरमन व संस्थेचे मार्गदर्शक सचिनशेठ सातव, सचिव सुरजशेठ सातव यांनी,तर श्री.शिवाजीराव काकडेदेशमुख देशमुख यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी संघटनेचे नेते सतीशराव काकडे देशमुख ,सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभिजीत भैया काकडे देशमुख यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025