मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या घोषणा देत सोमेश्वर नगर येथे निषेध व्यक्त करून पाळला कडकडीत बंद.

mnewsmarathi 04 Sep 2023 1 मिनिट वाचन 9,962 वाचन

 संपादक मधुकर बनसोडे.

 जालना जिल्ह्यातील सराटी येथील मराठा आंदोलकांवरती झालेल्या लाठी चार्जचा निषेधार्थ बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे बारामती बंद च्या पार्श्वभूमी वरती सोमेश्वर नगर येथे निषेध व्यक्त करीत कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी सोमेश्वर कारखाना येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निरा बारामती रोड येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

 यावेळी बोलताना सोमेश्वर चे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी झालेला घटनेचा निषेध व्यक्त करीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घालून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी भावना व्यक्त केली. यावेळी पोलीस प्रशासनाकडून देखील चोक बंदोबस्त लावण्यात आला होता . वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन काळे यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन यावेळी दिले.कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही या घोषणा देत शेकडोच्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावरती उतरले होते

लेखक

mnewsmarathi

M News Marathi