मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

*श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय निंबुत या ठिकाणी शिक्षक दिन उत्साहात साजरा…*

mnewsmarathi 05 Sep 2023 1 मिनिट वाचन 9,564 वाचन

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालय निंबुत येथे ५ सप्टेंबर२०२३ रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन *शिक्षक दिन* म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला….
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली ननावरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवन परिचय करून दिला.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री भीमराव बनसोडे सर यांनी केले.यावेळी साक्षी जाधव, तन्वी,पवार,राधा ननवरे व वेदांत केंजळे या विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. भीमराव बनसोडे सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला व व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक शिक्षकाचे महत्त्व सांगितले.
यावेळी इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांनी ५वी ते ९वी च्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी बनसोडे व संस्कृती बनसोडे यांनी केले व आभार राधा ननावरे हिने मानले.
संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सतीशभैय्या काकडे दे.तसेच मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi