मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

बारामती ! सुपा पोलिसांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या ५९ जनावरांचे वाचवले प्राण, ७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जात .

mnewsmarathi 16 Sep 2023 1 मिनिट वाचन 8,617 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

सुपा पोलीस स्टेशन हद्दीत दि. १४/०९/२०२३ रोजी रात्रगस्त करित असताना सुपा पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक डी. डी. धुमाळ, पोलीस अमलदार के. व्हीं. ताडगे हे सुपा ते लोणी पाटी या रोडने गस्त घालत असताना पहाटे २ वा ४५ वाजताच्या दरम्यान बाबुर्डी गावच्या हद्दीत कऱ्हा नदीच्या पुलाजवळ दोन संशयित पिकप उभे असलेले मिळून आले. पिकप नंबर MH.४२. AQ.०२९२ व MH. १२. SF. ५०२८ याची जवळ जाऊन पाहणी केली असता,MH .४२ .AQ. ०२९२ यामध्ये २० जर्सी गाईचे वासरे व MH .१२ .SF. ५०२८ यामध्ये २५जर्सी गायचे वासरे दोन्ही पिकप मध्ये असे एकूण मिळून ४५ जर्सी गाईचे वासरे निर्दयतेने कोंबून ठेवलेले मिळून आले. याबाबत सदर पिकप मधील संशयित इसम व चालक यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचे जर्सी गाय वासरे हे अवैद्य कतली करता घेऊन जात आहे असे सांगण्यात आले . तसेच यातील आणखी काही जनावरे लोणी भापकर ता. बारामती जि. पुणे येथे नामे मोहम्मद गुलाब तांबोळी रा.लोणी भापकर ता बारामती जि. पुणे यांच्या गोठ्यामध्ये डांबून ठेवले आहेत असे सांगितले .

सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना देऊन त्यानंतर सुपा पोलीस स्टेशन टीम यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे व त्यांची टीम यांना फोन द्वारे संपर्क करून लोणी भापकर येथील गोट्यांमध्ये क्रूर पद्धतीने डांबून ठेवलेले १४ जर्सी गाई व कालवड असे जनावरे ताब्यात घेतली. सदर कारवाई मध्ये एकूण ७,५५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यातील नामे राजा हुसेन शेख, अमर हाजी शेख, हुसेन इमाम शेख, वरील तिन्ही रा. निरावागज ता. बारामती जि.पुणे, कौसीन जमील कुरेशी, आरिफ राजू कुरेशी दोन्ही रा.पंजाब वस्ताद चौक, करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर, मोहम्मद गुलाब तांबोळी, रा.लोणी भापकर, ता. बारामती, जि. पुणे असे ६ ईसमानवरती सुपा पोलीस स्टेशन येथे प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे , उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे, सहाय्यक फौजदार जाधव, वाघोले, साळुंखे, पोलीस नाईक धुमाळ,पोलीस शिपाई जावीर, ताडगे,दरेकर, साळुंखे यांनी मिळून केली.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi