करंजेपूल ता बारामती. दि.27 सोमेश्वर सुपर मार्ट माॅलची माजी सैनिकांनी एकत्र येऊन केली स्थापना.

माझा जिल्हा

 प्रतिनिधी.

माॅलचे उद्घाटन मा.श्री पुरूषोत्तमदादा जगताप चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना,वाॅङिनरी लेफ्टनंट अदित्य शेळके , विश्वास आबा जगताप संचालक सोमेश्वर कारखाना या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सोमेश्वर सुपर मार्ट मध्ये सर्व प्रकारचा किरणा तसेच घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वस्तु तसेच सौंदर्य प्रसाधने अत्यंत माफक दरात उपलब्ध करण्यात आली आहेत.सुसज्ज असा माॅल उभारण्यात आला आहे.ग्राहकांनी एकवेळ प्रत्यक्ष येऊन सोमेश्वर सुपर मार्ट मधून किराणा व इतर वस्तू खरेदी कराव्यात आसे आवाहन प्रोप्रायटर अनिल शिंदे ,प्रशांत शेंङकर,विक्रम धुर्वे,निलेश शिंदे यांनी केले आहे.या कार्यक्रमास ऋषीकेश गायकवाड संचालक सोमेश्वर कारखाना, वैभव गायकवाड सरपंच करंजेपूल,अजिंक्य सावंत अध्यक्ष समर्थ ज्ञानपीठ वाघळवाङी,आगम तलाठी साहेब,शिवाजीराव शेंङकर सामाजिक कार्यकर्ते,महेंद्र शेंङकर, महेश शेंङकर, महेंद्र गायकवाड, भाऊसाहेब हूंबरे परिसरातील मान्यवर ग्रामस्थ व आजी माजी सैनिक परिवार बहूसंख्येने उपस्थित होते.*

*तसेच सैनिक कल्याण संघ बारामती च्या मुख्य कार्यालयाचे उदघाटन दिपक शेळके यांच्या शुभ हस्ते झाले याप्रसंगी बाळासाहेब नवले, भूमी अभिलेख अधिकारी राजू चव्हाण,जयपाल भोसले, विजय गोलांडे, सुनील लोखंडे, विट्ठल भापकर, विक्रम जगताप ,दत्तात्रय कदम ,दिपक जगताप ,मोहन ठोंबरे आणी विविध भागातून माजी सैनिकांनी उपस्थीती दाखवली या मुख्य कार्यालयातून सैनिकांच्या साठी विविध वेलफेअर देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे तसेच बचत गट चे मुख्य कार्यालय यामधून बचत गटाचे सर्व कामे होणार आहेत.*

यासाठी आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिपक शेळके यांनी दिले.