• Home
  • माझा जिल्हा
  • काकडे महाविद्यालयात ‘मेरी माटी मेरा देश अभियान’ या उपक्रमाचे आयोजन
Image

काकडे महाविद्यालयात ‘मेरी माटी मेरा देश अभियान’ या उपक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी

           सोमेश्वरनगर- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंडळ आणि ग्रामपंचायत वाघळवाडी व सैनिक कल्याण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी माटी मेरा देश अभियान’ या उपक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले आहे.

           या अभियानासाठी प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू मा. डॉ. पराग काळकर व या अभियानाचे प्रमुख संयोजक तथा महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीचे सदस्य मा. श्री राजेशजी पांडे व महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीशराव काकडे- देशमुख, प्रसिद्ध उद्योजक श्री.आर. एन. (बापू) शिंदे व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.अभिजीत काकडे- देशमुख उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी दिली.

           या अभियानासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयावर आयोजनाची जबाबदारी दिली आहे. यासाठी बारामती तालुक्यातील सर्व विद्यापीठ संलग्न महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या अभियान उपक्रमासाठी बारामती तालुक्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे.

Releated Posts

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ; जलसंधारण व शेती विकासाला नवी गती

सहसंपादक – अक्षय थोरात खांडज येथे बेंदचारी चारी खोलीकरण कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री…

ByBymnewsmarathi Jun 10, 2026