प्रतिनिधी
सोमेश्वरनगर- सोमेश्वरनगर येथील मु.सा काकडे महाविद्यालयाने बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या प्रांगणावर संपन्न झालेल्या बारामती तालुकास्तरीय शासकीय शालेय मैदानी स्पर्धेत भरघोस यश संपादन केले .यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, प्रा. महेंद्रसिंह जाधवराव, ऋषिकेश भैय्या धुमाळ, प्रा.सुजाता भोईटे मॅडम,महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे सर डॉ. प्रवीण ताटे-देशमुख सर डॉ. जया कदम मॅडम आयक्यू सी चे समन्वयक डॉ.संजू जाधव उपप्राचार्य प्रा.रविंद्र जगताप, पर्यवेक्षिका प्रा.जयश्री सणस, यांनी अभिनंदन केले. पुढील बालेवाडी क्रीडा संकुल पुणे येथे संपन्न होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे
१) गायकवाड श्रृती बापूराव-प्रथम क्रमांक (१९वर्ष वयोगट मुली १५०० मीटर धावणे, गोळा फेक (द्वितीय) १२वी वाणिज्य )
२) जाधव धीरज नरेंद्र -प्रथम क्रमांक (१९वर्ष वयोगट मुले, ८०० मीटर धावणे, १२वी विज्ञान)
३) सावंत ओंकार रामदास-द्वितीय क्रमांक(१९वर्ष वयोगट मुले, ४०० मीटर धावणे, १२वी विज्ञान)
४) शिंदे धनराज संतोष – द्वितीय क्रमांक (१९वर्ष वयोगट मुले, लॉंग जंप, ११वी विज्ञान)
५) निंबाळकर रूपाली विजय द्वितीय क्रमांक (१९वर्ष वयोगट मुली, थाळी फेक, १२वी कला)
६) वीर राज हृदयनाथ-तृतीय क्रमांक (१९वर्ष वयोगट मुले, गोळा फेक, १२वी विज्ञान)
७) गायकवाड सृष्टी सचिन-तृतीय क्रमांक (१९वर्ष वयोगट मुली, गोळा फेक, ११वी वाणिज्य)
८) सांघिक रिले (१००×४)
मुली -द्वितीय क्रमांक
१) साळवे आकांक्षा सुधीर
२)गायकवाड श्रुती बापूराव
३)गायकवाड श्रद्धा बापूराव
४)काकडे अंजली हरीश्वर
यशस्वी विद्यार्थ्यांना व संघाला प्रा. डॉ.बाळासाहेब मरगजे, प्रा दत्तराज जगताप, अंकुश दोडमिसे यांनी मार्गदर्शन केले.