मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 6 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
खेळ

सिकंदर शेख याच्याकडे मानाची महाराष्ट्र केसरीची गदा, गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं अस्मान

mnewsmarathi 10 Nov 2023 1 मिनिट वाचन 9,085 वाचन

प्रतिनिधी

महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला वीस सेकंदाच्या चीत करत मैदान मारलं. बलदंड शरीर यष्टीच्या शिवराजला अवघ्या दहा सेकंदामध्ये त्याने अस्मान दाखवत 66 वा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. मागील वर्षी हुकलेली संधी सिकंदरच्या डोक्यात होती. अवघ्या महाराष्ट्राने महेंद्र गायकवाड याच्याकडून झालेला पराभव पाहिला होता. पण गडी खचला नाही आपला सराव सुरू ठेवला आणि यंदा मागील वर्षीचा विजेता शिवराज राक्षे याला पराभूत विजयश्री मिळवला.

माती विभागामध्ये झालेल्या सेमी फायलनमध्येही सिकंदर याने संदीप मोटे याचा 10-0 ने पराभव करत एकतर्फी विजय मिळवत फायनल गाठली होती. तर गादी विभागामध्ये शिवराज राक्षे याने हर्षद उर्फ माऊी कोकाटे याला 13-2 ने पराभूत करत फायनल गाठली होती. दोघेही मोठे मल्ल, बलदंड शरीरयष्टीचा शिवराज आणि चपळ चिता असलेला सिकंदर यांच्यात डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या कुस्तीची अपेक्षा सर्वांना होती. मात्र सिकंदरने सुरूवातीला झोळी डाव टाकत अवघ्या काही सेकंदातच मैदान मारलं.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi