• Home
  • इतर
  • *पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन*
Image

*पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन*

: प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन २०२३-२४ आंबिया बहारमध्ये डाळिंब, केळी व आंबा या फळपिकांना लागू करण्यात आली असून या योजनेचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून तालुक्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातीत अधिसूचित पिकांसाठी ऐच्छीक आहे. उत्पादनक्षम फळबागांनाच विमा सरंक्षणाचे कवच लागू राहणार आहे. नुकसान भरपाई ‘महावेध’ प्रकल्पातंर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्रांच्या आकडेवारी नुसार ठरविण्यात येते.

बारामती तालुक्यातील समाविष्ट महसूल मंडळातील डाळिंब फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जानेवारी २०२४ असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ९ हजार ७५० रुपये इतकी आहे. केळी फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२३ असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ७ हजार रुपये इतकी आहे.आंबा फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२३ असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ४० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम १५ हजार ४०० रुपये इतकी आहे.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी मृग बहारातील फळपिकांची विमा नोंदणी करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल https://pmfby.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. अधिक माहितीसाठी भारतीय कृषी विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक १८०० ४१९ ५००४, भ्रमणध्वनी क्र.९८२२७६७५३३, pikvima@aicofindia.com या ईमेल पत्त्यावर संबंधित मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025