उत्कृष्ट आरोग्यसेवेबद्दल डाॅ.रविंद्र जगतकर यांना सवित्रीज्योती राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर* _*मित्र परिवाराकडून डाॅ.रविंद्र जगतकर यांचे अभिनंदन*_

Uncategorized

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांना निर्वाण फाउंडेशन, नाशिक यांच्या तर्फे “सवित्रीज्योती राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार २०२३” देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती एका पत्राद्वारे प्राप्त झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून मान्यवर, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत.
निर्वाण फाउंडेशन, नाशिक यांच्या तर्फे “सवित्रीज्योती राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार २०२३” सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वास त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरित करून त्यांच्या कार्यास बळ देण्याच्या विधायक उद्देशाने कर्तृत्ववान व्यक्तींना दरवर्षीच हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. यावेळी सामाजिक, आरोग्य क्षेत्रात आपल्या कार्यशैलीचा आगळा-वेगळा ठसा उमटविणाऱ्या, ठाणे व रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक तथा परळी शहरातील जगतकर गल्ली येथील भूमिपुत्र डाॅ.रविंद्र प्रकाश जगतकर यांनी सामाजिक बांधिलकीतून वैद्यकीय क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून “रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा” मानत कार्य करत आहेत.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फूले जण आरोग्य योजनेचा 34 हजार पेक्षा नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे. गेली 10 वर्ष वैद्यकीय सेवा केलेली आहे. रूग्णसेवा करणं हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. परंतु एक माणूस म्हणून सुद्धा त्यांनी चांगले काम या भागात उभारले आहे. कोरोनाच्या काळात असंख्य गोर-गरीबांना व सर्वसामान्यांना मदतिचा हात दिला आहे. वैद्यकीय सेवेत असताना अनेक रुग्णानाचे जीव वाचविण्यासाठी केलेला प्रयत्न हा माणूसकीचे दर्शन घडवितो. सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन कामगिरी केली आहे. यापूर्वी ही त्यांनी केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्यामुळे याआधी बऱ्याच राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानीत झालेले आहेत. त्याच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन निर्वाण फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने दिला जाणारा “सवित्रीज्योती राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाला आहे.
रविवार २९ ऑक्टोबर २०२३ रोजी, रोटरी कम्यूनिटी हॉल, गंजमाळ, नाशिक येथे दुपारी १२:०० वाजता होणार आहे. तर अभिनेत्री सावली पाटील, उपनगर पोलीस स्टेशन पो. नि. विजय पगारे, अभिनेता प्रशांत केळकर, मिस इडिया शिल्पी अवस्थी, उद्योगपती मकरंद साळी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती सदरील पुरस्काराचे विशेष समारंभात वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये स्मृतीचिन्ह, सन्मान पत्र , शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी डाॅ.रविंद्र जगतकर म्हणाले की, मिळालेला पुरस्कार माझी सामाजीक जबाबदारी व काम करण्याची नैतिक जबाबदारी वाढवीत आहे तसेच ते माझा उत्साह वाढवीत मला सकारात्मक ऊर्जा देत माझी प्रेरणा वाढवीत असल्याचे मत त्यांनी. आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले. या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल डाॅ.रविंद्र जगतकर यांचे सामाजिक, वैद्यकीय व सर्व क्षेञातील मान्यवर, मित्र परिवार व नातेवाईकांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.