मराठा समाजाला आरक्षण जाहीर होईपर्यंत सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना निंबूत येथे गाव बंदी.

Uncategorized

प्रतिनिधी.
अंतरवाली सराटी या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली त्या पाठोपाठ राज्यातील जवळपास सर्वच गावांमधून राजकीय पुढार्‍यांना व त्यांच्या बगलबच्चांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली. त्याच पार्श्वभूमी वरती निंबुत येथील ग्रामस्थांनी देखील सर्व पक्षांच्या राजकीय पुढार्‍यांना व त्यांच्या बगलबच्चांना नींबूत गावात प्रवेश बंद केला आहे. जर कोणी या नियमांचे उल्लंघन करेल तर त्याचा योग्य पद्धतीने समाचार घेतला जाईल असे देखील समाज बांधवांमधून बोलण्यात आले.
याच पार्श्वभूमीवरती सकल मराठा समाज व निंबूत ग्रामस्थांच्या वतीने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे पत्र बारामती तहसीलदार यांना देण्यात आले.