मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

दारु पिऊन कुटुंबीयांना शिवीगाळ करणाऱ्या जन्मदात्या बापाची मुलाने केली हत्या

mnewsmarathi 17 Nov 2023 1 मिनिट वाचन 8,673 वाचन

प्रतिनिधी

सोलापूर च्या माळशिरस येथील शिंगणापूर नातेपुते येथे सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. वडील सतत दारू पिऊन कुटुंबीयांना मारहाण करत असल्याच्या त्रासाला कंटाळून मुलानेचे बापाची हत्या केल्याचे उघड झाले आहे. अवघ्या १२ तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

मुलगा सुरज सावंत असे आरोपी मुलाचे नाव आहे. तर पांडूरंग चंद्रकांत सावंत असे खून करण्यात आलेल्या वडिलांचे ना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि १५) सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास येथील शिंगणापूर नातेपुते मार्गावर पिंपरी भवानी घाट येथे एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृत व्यक्तीच्या डोक्यावर, तोंडावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळल्याने हा खून असल्याचे प्राथमिक तपासात सिद्ध झाले होते.

पोलिसांनी या घटनेचा तपास करण्या सुरुवात केली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखा आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खूणे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. दरम्यान, ही व्यक्ति माळशिरस तालुक्यातील मौजे कोंडबावी येथील रहिवाशी असल्याचे समजले. पांडुरंग यांच्या मुलगा सुरज याने त्यांचा मृतदेह ओळखला आणि या प्रकरणी अज्ञात व्यक्ति विरोधात तक्रार दिली. दरम्यान, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला.

पोलिसांनी गावात चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी पांडुरंग याला दारूचे व्यसन असून तो त्याच्या आहारी गेल्याचे कळले. दारू पिऊन तो घरातील व्यक्तींना त्रास देत होता. या त्रासाला घरचे कंटाळले होते. दरम्यान, तक्रारदार मुलाने वडील पांडुरंग यांची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी चौकशीसाठी सूरजला ताब्यात घेतले.

त्याची कसून चौकशी केली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांना त्याच्यावरील संशय बळावला. त्याला पोलिसांचा हिसका दाखवल्यावर त्याने गुन्ह्या कबूल केला. वडील पांडुरंग हे अनेक वर्षापासून घरातील लोकांना दारू पिऊन सारखे सर्वांना शिवीगाळ आणि मारहाण करत होते. या त्रासाला कंटाळून सुरजने वडील घरी आल्यानंतर त्यांना एका खोलीमध्ये कोंडून लोखंडी गजाने गंभीर मारहाण करत त्यांचा खून केला. यानंतर त्यांचा मृतदेह हा पिकअपमध्ये टाकून पांडुरंग यांची दुचाकी बहिणीने चालवत नेत, नातेपुते येथील शिंगणापूर भवानी घाटात मृतदेह टाकून दिला.

 

लेखक

mnewsmarathi

M News Marathi