वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित करंजे पुल चौकीचे पोलीस उपनिरीक्षक योगेश जी शेलार यांच्या निरोप समारंभ वेळी अनेक नागरिकांना अश्रू अनावर.

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे.

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या करंजे पूल पोलीस चौकीमध्ये
कार्यरत असणाऱ्या श्री योगेशजी शेलार यांचा निरोप समारंभ करंजे पूल पोलीस चौकी येथे पार पडला यावेळी अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अनेक नागरिकांना, व महिला भगिनींना आपले अश्रू आवरता आले नाही. योगेश जी शेलार यांनी आपल्या कार्यकाळामध्ये अनेक नागरिकांना वाद विवादापासून अलिप्त राहण्याचे मार्ग सांगितले. नेहमी सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहणे सर्वसामान्य वरती अन्याय होणार नाही याची खबरदारी घेणे हाच त्यांच्यातला एक गुण त्यांनी नेहमीच जोपासला सोमेश्वर परिसरातील युवक वर्गामध्ये श्री शेलार यांची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे.
त्यामुळे या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात युवक वर्ग देखील उपस्थित होता. पोलीस व नागरिक यांच्यामधील एक जिव्हाळ्याचे नाते श्री शेलार यांनी निर्माण केले होते.
शेवटी श्री शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आयुष्यात अनेक पद मिळतील पण त्या पदांपेक्षाही आयुष्यात कमवलेली माणसं ही खूप मोलाची असतात
सोमेश्वर परिसरामधील कायदा व सुव्यवस्था नेहमीच अबाधित ठेवण्यामध्ये श्री शेलार हे सक्षम राहिले आहेत.
सोमेश्वर परिसरामध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो असेही श्री योगेश शेलार यांनी बोलताना सांगितले.
करंजे पूल येथील आभाराचे भाषण करीत असताना श्री शेलार यांना देखील अश्रू अनावर झाले.

 सदर कार्यक्रमाचे आयोजन सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने करण्यात आले होते.