मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

ओतूर परिसरात शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका तर डिंगोरेत घरावर विज कोसळली

mnewsmarathi 27 Nov 2023 1 मिनिट वाचन 9,660 वाचन

प्रतिनिधी

ओतूर ता.जुन्नर व परीसरातील गावामध्ये रविवारी रात्री अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतात पाणी साठून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर डिंगोरे येथे अवकाळी पाऊस सुरू असताना रात्री घरावर विज कोसळली सुदैवाने कोणतीही जीवित हानीझालीनाही.ओतूर,उदापूर,डिंगोरे,नेतवड,माळवाडी,बल्लाळवाडी,पिंपळगाव,जोगा,कोळवाडी,वाटखळे,सितेवाडी,मढ,पारगाव,खूबी,करंजाळे,खिरेश्वर,सांगनोरे,कोपरे,मांडवे,मुथाळणे चिल्हेवाडी,आंबेगव्हाण,रोहोकडी व परीसरातील गावामध्ये काही ठिकाणी रविवारी दुपारी तर काही भागात रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात वीजासह ढगांच्या गडगडाटासह वादळी वारा वाहत अवकाळी पाऊस झाला.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi