बारामती शहरातील ‘तीन हत्ती चौकाला ‘ भुलभुलैय्या चौक असे नाव का देण्यात येऊ नये ? मनसे तालुका संघटक ऋषिकेश भोसले

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती शहारात जुन्या ‘तीन हत्ती चौकामध्ये’ वारंवार अपघात घडत असतात यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग बारामती यांना निवेदन देण्यात आले.

बारामतीकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या परंतु सध्या नगरपरिषद प्रशासन असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांच्या कृपेमुळे शहरातील प्रमुख असणारे तीन हत्ती चौकात सध्या नक्की करणार आहेत काय? आता झालय काय? पुढे होणार आहे काय ? असा प्रश्न बारामतीकरांना सध्या पडलेला आहे. सदर चौकात इटली होणार आहे की, फ्रान्स ? विकासाचा व्यापक दृष्टीकोन घेवून महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी बारामती सुशोभिकरन्याचे हाती घेतले आहे ते मात्र स्तुत्य असे दिसत आहे .

परंतु सध्याची परिस्थिती बघीतली तर तीन हत्ती चौकामध्ये रोज अपघात घडत आहेत . त्या ठिकाणी सायंकाळी अंधार असतो सर्व बाजूने वाहने येत असतात, कोण कुठल्या दिशेला जाणार आहे, वळणार आहे हे समजत नाही. मुख्य रहदारीचा रस्ता असल्या कारणामुळे शाळेतून येणारी लहान मुले ,वयोवृध्द ,ज्येष्ठ नागरीक यांना रस्ता ओलांडून जाणे धोकादायक झालेले आहे.

यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिनहत्ती चौकामध्ये बॅरेकेटींग करून त्वरीत उपाययोजना करावी की जेणे करून वाहनांचे अपघात होणार नाहीत गंभीर स्वरूपाची वित्त हानी व जीवीत हानी होणार नाही. अन्यथा येथुन पुढे घडणाऱ्या सर्व अपघातांची संपूर्ण जबाबदारी आपली व आपल्या प्रशासनाची राहील. असे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभाग बारामती यांना देण्यात आले आहे .

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष ॲ‌ड .पोपटराव सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष ॲ‌ड .निलेश वाबळे, तालुका संघटक ऋषिकेश भोसले, शहर उपाध्यक्ष ओम पडकर व इतर पदाधिकारी उपस्थीत होते.