• Home
  • इतर
  • बारामती ! भारतीय पत्रकार संघाच्या वतीने करंजे येथे नवनिर्वाचित सरपंच यांचा सन्मान सोहळा व नवीन पदाधिकाऱ्यांना आय कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न 
Image

बारामती ! भारतीय पत्रकार संघाच्या वतीने करंजे येथे नवनिर्वाचित सरपंच यांचा सन्मान सोहळा व नवीन पदाधिकाऱ्यांना आय कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न 

प्रतिनिधी – फिरोज भालदार

भारतीय पत्रकार संघाकडून बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर करंजे या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच ,उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार समारंभ याचबरोबर भारतीय पत्रकार संघ नवनियुक्त निवड झालेल्या सदस्यांची आयडेंटी कार्ड वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

या प्रसंगी करंजे येथील सरपंच भाऊसो हुंबरे, उपसरपंच सचिन पवार ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटोळे, मयुरी गायकवाड, अफसाना मुलाणी खुर्शिदा मुलाणी,तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड , करंजेपूल सोमेश्वरनगर च्या सरपंच पुजाताई गायकवाड , उपसरपंच शेखर गायकवाड, चौधरवाडीचे सरपंच शशिकांत पवार ,मगरवाडीच्या सरपंच विनिता हगवणे ,मुर्टी गावच्या सरपंच कोमलताई जगताप , सायंबाचीवाडी सरपंच जालिंदर भापकर ,उपसरपंच हनुमंत बांदल, वाकीचे सरपंच बोडरे , उपसरपंच इंद्रजित जगताप ,
हे उपस्थित होते . सर्व नवनिर्वाचित सरपंच ,उपसरपंच, सदस्य व भारतीय पत्रकार संघटनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी ,सदस्य यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा भारतीय पत्रकार संघ यांच्या वतीने देण्यात आले .

यावेळी भारतीय पत्रकार संघाचे लीगल विंगचे प्रदेशाध्यक्ष ॲड. कैलासजी पठारे, ॲड पांडुरंग ढोरे पाटील, ॲड समीर बेलदरे , विभागीय अध्यक्ष सिकंदरजी नदाफ, पुणे जिल्हा अध्यक्ष तैनुरभाई शेख ,पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित करंजेपुल पोलिस स्टेशनचे PSI कन्हेरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला .

यावेळी भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका चे अध्यक्ष विनोद गोलांडे,उपाध्यक्ष शंतनु साळवे ,सचिव सुशिलकुमार अडागळे, संघटक महंमद शेख ,हल्ला कृती समिती प्रमुख निखिल नाटकर ,कोषाध्यक्ष सोमनाथ जाधव ,संघ प्रेस फोटोग्राफर जितेंद्र काकडे, सोशल मीडिया प्रमुख मधुकर बनसोडे ,भारतीय पत्रकार संघ सदस्य पत्रकार रमेश कदम , सुभाष जेधे,फिरोज भालदार,ऋषिकेश जगताप, अजय पिसाळ, शौकतभाई शेख, संजय कुंभार ,संतोष भोसले ,शरद भगत उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशीलकुमार अडागळे व मधुकर बनसोडे यांनी केले तर आभार विनोद गोलांडे यांनी मानले .

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025