बारामती ! वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन नजिक नीरा बारामती रोडवर अपघात ; एक जण गंभीर जखमी .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन नजिक नीरा बारामती रोडवर रात्री १० वाजण्याच्या दरम्यान उसाचा ट्रॅक्टर व तीन चाकी टमटम चा अपघात झाल्याची घटना घडली आहे . यावेळी तीन चाकी टमटम मध्ये २ जण प्रवास करत होते. ही गाडी निरा येथील बाजार करून वडगाव निंबाळकर येथे घरी चाले असता बारामती बाजूने उसाचा ट्रॅक्टर सोमेश्वर कारखाना याठिकाणी निघाला होता . यावेळी हा अपघात घडल्याचे समजले .

तीन चाकी टमटम ही वडगाव निंबाळकर येथील नारगे यांची असल्याचे समजत आहे . अपघाताच्या वेळी टमटम व उसाच्या ट्रॅक्टर च्या ट्रोलीची धडक होऊन टमटम नीरा बारामती रोडवर आदळली . यावेळी पोलिस स्टेशन नजिक स्थानिक लोकांनी टमटम मधील दोन्ही प्रवाशांना बाहेर काडले व यामध्ये नारगे हे गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले . त्यांना प्रथमोपचारासाठी बारामती येथे हलवण्यात आले .

यावेळी वडगाव निंबाळकर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व अपघाताची पाहणी केली आहे . यामध्ये ट्रॅक्टर चालक हा घटना स्थळावरून पळ काडत होता . वडगाव निंबाळकर पोलिस यांनी त्याचा पाठलाग करून उसाचा ट्रॅक्टर व ड्राइवर याला ताब्यात घेतले आहे .

पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस करत आहेत .