बारामती – वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न.

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

ज्या पद्धतीने तुमच्या स्कूलचे नाव रायझिंग स्टार आहे. त्याच पद्धतीने जास्तीत जास्त रायझिंग स्टार हे प्रत्येक विषयात तयार झाले पाहिजे. असे मत नुकतेच पायलेट म्हणून नेमणूक झालेल्या सिद्धी घाडगे यांनी वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलना वेळेस आपले मनोगत व्यक्त करताना वरील विधान केले आहे.

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात साजरी करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वडगाव निंबाळकरचे सरपंच सुनील ढोले हे होते तर प्रमुख पाहुणे सदोबाची वाडीचे उपसरपंच ऋषिकेश धुमाळ ,वडगाव ग्रामपंचायत उपसरपंच संगीता शहा, सदस्या अश्विनी खोमणे ,सारिका खोमणे, सदस्य अजित भोसले , रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संस्थेच्या अध्यक्षा कांचन काटे, माधव काटे व पालक वर्ग उपस्थित होते.

सिद्धी घाडगे हे आपले मनोगत मांडताना म्हणाल्या ज्या पद्धतीने आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. त्याच पद्धतीने शाळेत उपस्थित राहून आपल्या मुलांची माहिती घेत चला. यावेळी रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका दिपाली नलवडे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सरपंच सुनील ढोले,संस्थेच्या अध्यक्षा कांचन काटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली चव्हाण यांनी तर आभार मुख्याध्यापिका श्रद्धा मस्कर यांनी मानले. कार्यक्रमांमध्ये गणेश वंदना शिवाजी महाराज थीम नरवीर तानाजी मालुसरे यांची थरारक इंट्री तसेच विविध धाडसी नृत्य च्या माध्यमातून प्रेक्षकांची मने भारावून गेली. या कार्यक्रमासाठी कांचन साळवे, पूजा गाढवे, शिवाजी साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.