• Home
  • माझा जिल्हा
  • भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्र्यांचा बारामती तालुक्यात दौऱ्यांचा सपाटा.
Image

भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्र्यांचा बारामती तालुक्यात दौऱ्यांचा सपाटा.

संपादक मधुकर बनसोडे.

भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री यांचा बारामती तालुक्यात दौऱ्यांचा सपाट सपाटा सुरू झाल्याचे चित्र मागील काही दिवसापासून दिसत आहे. मागील काही दिवसापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दौरा झाला होता. त्या पाठोपाठ काल भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्या देखील दौऱ्याला सुरुवात झालेली आहे.

बारामती तालुक्यातील सुरुवातीचे निंबुत गाव या गावात देखील शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी प्रल्हादसिंग पटेल यांचे मोठ्या थाटात बारामती तालुक्यात स्वागत केले. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष बारामतीची निवडणूक ही अस्तित्वाची लढाई करणार असल्याची चर्चा बारामती तालुक्यातील नागरिकांमध्ये होत आहे. बारामती तालुक्यातील इतर पक्षातील काही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या गळाला लागल्याची देखील चर्चा बारामती तालुक्यात होत आहे?

भारतीय जनता पार्टी नक्की कोणता अजंठा घेऊन मतदारांच्या समोर जाणार अशी देखील चर्चा बारामती तालुक्यातील चौका चौकात रंगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या मंत्र्यांच्या गाठीभेटीने राष्ट्रवादी च्या बालेकिल्ल्यात सुरुंग लागणार का? हे येणाऱ्या निवडणुकीतच समजेल.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026