प्रतिनिधी – फिरोज भालदार
समाजाचा रोष पत्कारुन महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणा-या आणि ते प्रत्यक्षात आणणा-या क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जिवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकत आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या संघर्षमय जिवनावर आधारीत “सत्यशोधक” हा चित्रपट प्रसिद्ध झाला आहे .
याचेच औचित्य साधून बारामती तालुक्यातील मुरूम गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सत्यशोधक म्हणजे काय व शिक्षनेचा प्रसार त्याचबरोबर मुलींसाठी जे शिक्षणाचे दरवाजे खुले केले ते कोणाच्या माध्यमातून झाले हे दाखवण्यासाठी वानेवाडी येथील नवनाथ सिनेमागृह येथे सत्यशोधक हा चित्रपट दाखवण्यात आला .
यावेळी विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहून आनंद व्यक्त करत ह्या चित्रपटातून खूप काही शिकण्यासारखे होते आणि ते आम्ही घेतले असे सांगण्यात आले . यावेळी सर्व विद्यार्थी , शिक्षक , व शिक्षिका उपस्थित होते. हा चित्रपट खरच छान आहे आणि तो सर्वांनी पहावा असे देखील विद्यार्थी व शिक्षकांकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपट गृहात हा चित्रपट प्रदर्शीत झाला असुन या सिनेमाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणत उपस्थिती दर्शवुन या ऐतहासीक सिनेमाला भरभरून असे प्रेम मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे .