बारामती ! वडगांव निंबाळकर ते कोऱ्हाळे खुर्द रस्त्यावरील कमी उंचीचा पूल अखेर पाडला  .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर ते कोऱ्हाळे खुर्द रस्त्यावर वाहतूक जास्त प्रमाणत असताना तेथील पुलाचे कामाची उंची व काम निकृष्ट दर्जेचे झाल्याचे ‘एम न्यूज मराठी’ च्या माध्यमातून बातमी प्रसारित करण्यात आली होती . या प्रसारित बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने चारीवर उभारलेला कमी उंचीचा पूल अखेर पाडण्यात आला. या ठिकाणी नव्याने पूल बांधण्याचे काम चालू करण्यात आले आहे.

पुलाचे काम अस्तित्वात असलेल्या उंचीपेक्षा कमी होते. भविष्यात होणाऱ्या अपघात व पावसाळ्याच्या पूरपरिस्थितीमध्ये बंद राहू नये यासाठी गेली सहा महिने हा पूल नव्याने करावा यासाठी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच सुनील ढोले व कोऱ्हाळे खुर्द माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सूरज खोमणे यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल सहा महिन्यानंतर पाडण्यात आला आहे .

आता संबंधित ठेकेदाराला त्या जागी पुन्हा नवा पूल उभारण्यासाठी सूचना दिल्या आहेत व ते काम नव्याने चालू करण्यात आले आहे. या कामाच्या पाठपुराव्यासाठी वडगाव निंबाळकर मधील विविध सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य केले .

दरम्यान पूल पाहणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रामहरी मुखेकर यांनी भेट दिली. याबाबत ‘एम न्यूज मराठी’ ने बातमी प्रसिद्ध करताच या विषयावर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे वडगाव निंबाळकर आणि को-हाळे खुर्द ग्रामस्थांनी ‘एम न्यूज मराठी’ चे आभार मानले आहेत.