प्रतिनिधी
दि. १४/०१/२०२४ रोजी सकाळी ०९/३० वा. चे सुमारास दौंडज गावाचे पोलीस पाटील दिनेश बबन जाधव वय ४४ वर्षे व्यवसाय शेती (पोलीस पाटील दौंडज) ता. पुरंदर जि. पुणे मो.नं. ९८९०४१०४७५ हे त्यांचे राहते घरी असताना त्यांना त्यांचे गावातील अनिल पोपटराव कदम रा. दौंडज तरसदरा ता. पुरंदर जि. पुणे याचा त्यांचे मोबाईल फोनवर फोन आला व त्याने सांगीतले की, त्यांचे शेजारी राहणारे जय अनिल कदम, अनुष प्रविण कदम, जिवन अविनाश कदम हे कडेपठार या ठिकाणी खंडोबा देवाचे देवदर्शन करण्यासाठी सकाळी निघाले होते. ते लोक तरसदरा ते कडेपठार कच्चे रोडने पायी जात असताना दौडज हद्दीतील शिंगणारटोंगी डोंगर तरसदरा येथील पाऊल वाटेच्या डावे बाजुस निवडुंगाचे झाडाचे शेजारी एक आनोळखी इसम मयत झालेला आहे. असे कळविलेने म्हणुन मी तसेच आमचे गावातील शरद शहाजी जाधव असे आम्ही मयताची माहीती मिळाले ठिकाणी शिगणारटोंगी डोंगरद-यावर गेलो तिथे एक पुरुष जातीचा अनोळखी इसम वय ३० ते ३५ वर्षे त्याच दोन्ही हात पांढरे रंगाची त्यावर काळे डीझाईन अशा ओढणीने हात पाठीमागे बांधलेले, गळा ओढणीने आवळलेला, मयताचे अंगात- केसरी रंगाचा शर्ट, पायात काळया रंगाची पॅन्ट चॉकलेटी बनियान, गळ्याभोवती ओढणी आवळून त्यामधुन रक्त आलेचे दिसत होते. त्याचे चेहऱ्यावर व कानातुन रक्त आलेला दिसत आहे. तिथे एक पांढरी ओढणीचा तुकडा, एक चप्पल जोड पडलेला दिसत आहे. त्यावेळी माझी खात्री झाली की, अज्ञात व्यक्तीचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करणासाठी गळा आवळून खुन केला आहे. त्यांनतर मी तात्काळ वाल्हा पोलीस चौकीला फोन करून मयताची माहीती दिली त्यांनतर तिथे पोलीस आले त्यांनी पाहाणी करून मयतबॉडी पुढील कारवाई कामी जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे आणली आहे. माझी आता खात्री झाली आहे की, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीचा खुन करून मयत प्रेत डोगंरद-यात टाकुन निघुन गेले आहेत. म्हणुन अज्ञात व्यक्तींचे विरुध्द दौंडज पोलीस पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
सदर खुन झालेल्या व्यक्तीचे वर्णन :- एक पुरुष जातीचा अनोळखी इसम वय ३० ते ३५ वर्षे, अंगात तपकीरी रंगाचा शर्ट, नेसणीस काळे रंगाची पॅन्ट, वर्ण गोरा चेहरा उभट, केस काळे, हातात भगव्या रंगाचा दोरा त्यावर पिवळे पटटे, उजव्या हातावर ओम गोंदलेले त्याच दोन्ही हात पांढरे रंगाची त्यावर काळे डीझाईन अशा ओढणीने हात पाठीमागे बांधलेले, गळा ओढणीने आवळलेला, मयताचे अंगात- केसरी रंगाचा शर्ट, पायात काळया रंगाची पॅन्ट चॉकलेटी बनियान, गळयाभोवती ओढणी आवळुन त्यामधुन रक्त आलेचे दिसत होते.