• Home
  • माझा जिल्हा
  • विभागीय ग्रंथालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
Image

विभागीय ग्रंथालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त पुणे येथील शासकीय विभागीय ग्रंथालय येथे २८ जानेवारीपर्यंत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून वाचक, सभासद, विद्यार्थी, नागरीक अशा सर्व ग्रंथप्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रंथालयाचे प्र. ग्रंथपाल सुरेश द. रिद्दीवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रख्यात मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

उद्घाटनप्रसंगी श्री. रिद्दीवाडे म्हणाले, मराठी भाषा समृद्ध व्हावी तिचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी सर्वांचीच भूमिका फार महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त वाचकांनी पुस्तके वाचली पाहिजेत व मराठी भाषेची महती व व्यापकता विषद करणारे संदर्भ ग्रंथ व ज्ञानकोश सर्वांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमास ग्रंथालयाचे अधिकारी कर्मचारी, अभ्यासिकेतील विध्यार्थी, नागरीक तसेच वाचक उपस्थित होते. शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे, न. वि. गाडगीळ शाळा, शनिवार पेठ, पुणे- ३० येथे हे ग्रंथप्रदर्शन सर्वांसाठी दिनांक २८ जानेवारीपर्यंत खुले असणार आहे, असेही ग्रंथालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026