मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 22 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 27 January 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव; खून करून तरुण पसार

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
January 27, 2024 1 मिनिट वाचन 3,506 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करून एकाने तिचा गळा आवळून खून केल्याची घटना गोखलेनगर परिसरात घडली. पत्नीचा खून करून पसार झालेल्या तरुणाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेश्मा चंदर पंतेकर (वय ३०, रा. जनता वसाहत, जनवाडी, गोखलेनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चंदर अशोक पंतेकर (वय ३३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राहुल राजू मंजाळकर (वय २४, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेश्मा आणि चंदर यांचा बारा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना बारा वर्षांचा मुलगा आहे. काही महिन्यांपासून चंदर पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. त्यामुळे रेश्मा माहेरी गेल्या होत्या. १९ जानेवारी रोजी चंदरने रेश्माशी संपर्क साधला. माझी चूक झाली आहे. तू घरी ये, असे त्याने सांगितले. त्यानंतर रेश्मा घरी आल्या.  बुधवारी (२४ जानेवारी) राहुलने चंदरशी संपर्क साधला. तेव्हा रेश्मा कामावर गेल्याचे त्याने सांगितले. संशय आल्याने रेश्माचे वडील तिच्या घरी आले. तेव्हा रेश्मा बेशुद्धावस्थेत पडली होती. पंख्याला ओढणी बांधण्यात आल्याचे आढळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी चंदर पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख