• Home
  • इतर
  • जळगाव इथे “भारताचे संविधान” या विषयावरील मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
Image

जळगाव इथे “भारताचे संविधान” या विषयावरील मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन

खासदार, पालकमंत्री, आमदार, महापौर, उपमहापौर राहणार उपस्थित भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, जळगांवचा उपक्रम

संविधान दिना निमित्त भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, जळगाव आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान खान्देश मॉल, स्टेशनरोड, जळगाव येथे “भारताचे संविधान” व शासनाच्या विविध योजना या विषयावर मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन 26 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता होणार आहे. याप्रसंगी खासदार, उन्मेषदादा पाटील, पालकमंत्री, गुलाबराव पाटील, आमदार राजू भोळे, महापौर, जयश्री महाजन, उपमहापौर, कुलभूषण पाटील कार्यक्रमाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जळगावचे सहा. आयुक्त योगेश पाटील, केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक, संतोष देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत.सदर प्रदर्शनात भारताचे संविधान आणि शासनाच्या योजनांची माहिती सांगणारे सचित्र छायाचित्रे , तसेच डिजीटल वॉल, एलएडी टिव्हीवर चलचित्र स्वरूपात माहिती असणारे विविध चित्रपट/माहिती पट दाखवण्यात येतील . तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांच्या माहितीचा समावेश आहे. सदर प्रदर्शन 26 ते 28 नोव्हेंबर, 2022 पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 9 या वेळेत सर्वांसाठी विनमूल्य सुरू राहणार आहे. चित्रप्रदर्शनीच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, विविध स्पर्धा आदीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाला नागरीकांनी मोठ्या भेट देऊन भारताचे संविधान व शासनाच्या योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, जळगाव व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा प्रशासन, जळगाव यांनी केले आहे.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025