मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

संजय गांधी निराधार अनुदान योजनचे ११८ अर्ज मंजूर

mnewsmarathi प्रतिनिधी
January 31, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

तहसीलदार गणेश शिंदे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनचे ११८, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ५२ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना २ असे एकूण १७२ अर्ज मंजूर करण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवीन प्रशासकीय भवन येथे लाभार्थी निवड बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार सुवर्णा ढवळे, अव्वल कारकून व महसूल सहाय्यक आदी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील नागरिकांनाकडून प्राप्त झालेल्या एकूण १७२ अर्जाची छाननी करुन ते मंजूर करण्यात आले.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा