मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 14 February 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

अभ्यास करत नाही म्हणून आई वडील रागावले; १० वीची मुलगी घर सोडून सत्संगला लागली

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
February 14, 2024 1 मिनिट वाचन 3,503 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

दहावीची परिक्षा तोंडावर आली असून पालक मुलांना अभ्यास कर म्हणून मागे तगादा लावत असतात. यामुळे मुले बर्‍याचदा वैतागत असतात. आई वडिलांच्या अशाच तगाद्याला कंटाळून एका दहावीच्या मुलीने घर सोडून पलायन केले. ती थेट उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश येथील एका आश्रमात जाऊन सत्संगात रमली होती. विरार पोलिसांनी या मुलीला शोधून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

विरार पुर्वेला राहणारी १५ वर्षांची मुलगी १ फेब्रुवारी रोजी घरातून पळून गेली होती. तिच्या सर्वत्र शोध घेतल्यानंतर पालकांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला होता. ती कुणाच्याच संपर्कात नसल्याने तिचे अपहऱण केल्याची शक्यता होती. तिच्या मोबाईलचा माग काढून पोलीस तिचा शोध घेत होते. दरम्यान, ती उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश या धार्मिक स्थळी असल्याचे पोलिसांना समजले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोलनकर, पोलीस हवालदार मंदार दळवी आणि महिला पोलीस शिपाई वर्षा निकम यांनी ऋषिकेश येथे जाऊन तिचा शोध घेतला. पोलिसांनी तेथील आश्रम पालथे घातले आणि एका आश्रमात मुलगी आढळून आली. तिला पोलिसांनी उत्तराखंडावरून आणून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.

ही मुलगी दहावीला होती. ती अभ्यास करत नसल्याने पालक तिला रागावत होते. त्यामुळे तिने वैतागून घर सोडले. कुठे जायचे हे माहित नव्हते. ती टिव्हीवरील धार्मिक वाहिन्यांपासून उत्तराखंड मधील ऋषिकेश येथे अनेक आश्रम असून तिथे राहण्याची आणि जेवणाची सोय होते हे तिला माहिती होते. त्यामुळे ती एकटी ट्रेनने तिथे पोहोचले. सकाळ संध्याकाळी ती भजन आणि इतर धार्मिक कार्यक्रमात भाग घेत होती, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोलनकर यांनी सांगितले.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख