मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

शहरात पुन्हा एकदा ‘सिरियल रेपिस्टची’ दहशत, मोकाट विकृताचा आणखी एका चिमुकलीवर बलात्कार

mnewsmarathi प्रतिनिधी
February 14, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

मागील ४ महिन्यांपासून मोकाट असणार्‍या सिरियल रेपिस्टने आणखी एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. नालासोपारा येथे मंगळवारी दुपारी ७ वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अनैसर्गिक बलात्कार केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून विकृताला पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृतांची (सिरियल रेपिस्ट) दहशत पसरली होती. हे दोन विकृत वसई विरार आणि नालासोपारा शहरामध्ये सध्या शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून तसेच घराबाहेर खेळणार्‍या चिमुलकल्या मुलींना आडोशाला नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. या प्रकरणी तुळींज पोलिसांमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी या दोन्ही विकृत आरोपींना (सिरियल रेपिस्ट) पकडण्यासाठी पथके बनवून आरोपींची छायाचित्रे ठिकठिकाणी लावण्यात आली होती. तसेच त्यांची माहिती देणार्‍यास बक्षिस जाहीर करण्यात आले होते. या विकृतांपैकी एक विकृत विशाल कनोजिया याला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने वाराणसी येथील केंट रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली होती. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या (एसटीएफ) मदतीने ही कारवाई करण्यात आली होती. मात्र दुसरा विकृत पोलिसांच्या हाती लागला नव्हता.

पोलीस या विकृताचा शोध घेत असतानाच या मोकाट असलेल्या विकृताने मंगळवारी दुपारी नालासोपारा येथील एका चिमुकलीला आपले शिकार बनवले. पीडित मुलगी ७ वर्षांची असून ती नालासोपारा पूर्वेला राहते. दुपारी साडेबाराच्या सुमारास एक विकृत तिच्या इमारतीजवळ आला. या पीडित मुलीला त्याने बळजबरीने पळवून इमारतीच्या गच्चीवर नेले आणि तिच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात या विकृताविरोधात अनैसर्गिक बलात्कार (कलम ३७७), अपहरण (कलम ३६३) तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) च्या कलम ४, ६ ८ आणि १० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस मागावर असतानाही या विकृताने एका मुलीवर बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांबरोबर गुन्हे शाखेची पथके परिसर पिंजून काढून आरोपीचा शोध घेत आहेत. लवकरच आम्ही आरोपीला पकडू, असा विश्वास गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा