• Home
  • क्राईम
  • कोरेगाव पार्कमध्ये वेश्याव्यवसायावर छापा; थायलंडमधील तरुणी ताब्यात
Image

कोरेगाव पार्कमध्ये वेश्याव्यवसायावर छापा; थायलंडमधील तरुणी ताब्यात

प्रतिनिधी

कोरेगाव पार्क भागातील एका सदनिकेत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी छापा टाकून थायलंडमधील दोन तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी थायलंडमधील एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस हवालदार रईसा बेग यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्याविरुद्ध अनैतिक मानवी देहव्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु्न्हा दाखल करण्यात आलेली महिला मूळची थायलंडमधील आहे. तिने कोरेगाव पार्कमधील एका सोसायटीत सदनिका भाडेतत्त्वावर घेतली होती.

थायलंडमधील दोन तरुणींना स्पामध्ये काम देण्याच्या आमिषाने तिने भारतात आणले होते. कोरेगाव पार्कमधील सदनिकेत थायलंडमधील दोन तरुणी वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपुते, गु्न्हे शाखेचे निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनखाली पथकाने सदनिकेत छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या महिलेविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.

Releated Posts

रांजणगाव MIDC मध्ये देहव्यापारावर धाड; सात महिलांची सुटका, दोन अटकेत

प्रतिनिधी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आणि दहशतवाद विरोधी शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत एका लॉजिंगमध्ये चालणाऱ्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

जुन्नर तालुक्यात दुहेरी हत्याकांड, रात्रीत होत्याच नव्हत झालं..

प्रतिनिधी जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ गावच्या हद्दीत बगाडवाडी येथे तळेरान गावच्या शिवेवर राहत असलेल्या मुकने कुटुंबात अत्यंत…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

बारामती तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांकडून अवैद्य दारू विक्रेत्यांची धरपकड. हे उशिरा सुचलेले शहाणपण? यामुळे नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चा.

संपादक – मधुकर बनसोडे. काही दिवसांपूर्वीच पुणे शहरामधील हडपसर येथे भेसळयुक्त दारू पिल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या…

ByBymnewsmarathi Jun 2, 2026

हुंड्याच्या छळातून १८ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

प्रतिनिधी पुण्यातील कोथरूड परिसरात हुंड्यासाठी छळ करून १८ वर्षीय विवाहितेची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला…

ByBymnewsmarathi May 12, 2026