• Home
  • क्राईम
  • कोयते उगारून टोळक्याची दहशत; येरवडा, लोहगाव भागात वाहनांची तोडफोड
Image

कोयते उगारून टोळक्याची दहशत; येरवडा, लोहगाव भागात वाहनांची तोडफोड

प्रतिनिधी

शहरात दहशत माजवणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्यानंतर येरवडा आणि लोहगाव भागात वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या. येरवड्यातील पांडू लमाण वसाहतीत टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी सोहम शशी चव्हाण आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जुगनू राकेश परदेशी (वय ४०, रा. भोरी चाळ, पांडू लमाण वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी चव्हाण आणि परदेशी ओळखीचे आहेत. चव्हाण आणि साथीदार शनिवारी पांडू लमाण वसाहतीत शिरले. त्यांनी शिवीगाळ करून नागरिकांना कोयत्याचा धाक दाखविला. कोयते उगारून दहशत माजविली. परदेशी यांचा भाचा अनिकेत सोनकरला मारहाण केली. या भागातील वाहनांची तोडफोड करून टोळके पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सुर्वे तपास करत आहेत.

लोहगाव परिसरातील कलवड वस्तीत टोळक्याने दहशत माजविल्याची घटना घडली. टोळक्याने दोन रिक्षांवर दगडफेक केली. या प्रकरणी करण विजय दोरकर (वय १९, रा. पठारे वस्ती, लोहगाव), शाबाद आयुब ओैटी (वय १८, रा. मुंजाबा वस्ती, लोहगाव), तसेच दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमोल अनंत कानू (वय ३९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोरकर, ओैटी आणि अल्पवयीन साथीदार लोहगावमधील कलवड वस्ती परिसरात आले. त्यांनी जुबेर कोठे राहतो, अशी विचारणा करून शिवीगाळ केली. आरोपींनी कोयते उगारून दहशत माजविली. दोन रिक्षांच्या काचांवर दगडफेक केली. सहायक पोलीस निरीक्षक तोरडमल तपास करत आहेत.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026