मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

क्षुल्लक वाद अन् मित्रावर कुऱ्हाडीने सपासप वार!

mnewsmarathi 18 Feb 2024 1 मिनिट वाचन 9,877 वाचन

प्रतिनिधी

सोबत काम करणाऱ्या दोन मित्रांत वाद उफाळून आल्याने जेवण करीत असलेल्या मित्राच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याची घटना कारंजा तालुक्यातील टाकळी गावात शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी घटना स्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

प्राप्त माहितीनुसार कारंजा तालुक्यातील टाकळी गावातील मृतक व आरोपी हे दोघे सोबत काम करीत असल्याचे समजते. नेहमी सोबत असणाऱ्या एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री दारू प्यायल्यानंतर संतोष घोरमोडे आणि त्याच्या मित्रामध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. यानंतर संतोष घोरमोडे हा स्वतः च्या घरी येऊन जेवण करीत होता. त्याचवेळी आलेल्या मित्राने अचानक संतोषच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने संतोषचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपी घटना स्थळारून पसार झाला असून हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

वाशीम जिल्ह्यात बहुतांश गावात राजरोसपणे अवैध दारू विक्री केली जाते. यातून किरकोळ वाद उफाळून आल्याने हाणामारीच्या घटना देखील समोर येत आहेत. दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. जिल्ह्यात पोलिसांचा दबदबा ओसरत चालला असून शहरी भागापूरती मर्यादित असलेली गुन्हेगारी आता ग्रामीण भागातही पोहचली आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi