• Home
  • क्राईम
  • पोटच्या गोळ्यानेच आईला संपवले, कुऱ्हाडीने केली हत्या; वडील जखमी
Image

पोटच्या गोळ्यानेच आईला संपवले, कुऱ्हाडीने केली हत्या; वडील जखमी

प्रतिनिधी

कोरपना तालुक्यातील लोणी येथे मुलाने वयोवृद्ध आई-वडिलांना एका खोलीत बंद करून कुऱ्हाडीने वार केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी वडिलांना कोरपना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आल्याचे कळते.

मनोज पांडूरंग सातपुते (४५) असे आरोपी मुलाचे नाव आहे. शेतीच्या ठेक्यातून मिळालेल्या पैशावरून त्यांच्यात वाद झाला आणि या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. आरोपी मुलांने आई आणि वडिलांना एका खोलीत बंद केले. यानंतर अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने ४ आणि हातावर २ वार तर वडिलांच्या डोक्यावर २ वार केले. यानंतर तो वहिनीच्या मागे धावला, मात्र ती एका खोलीत लपल्याने तिचा जीव वाचला. या घटनेत आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली.

Releated Posts

हुंड्याच्या छळातून १८ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

प्रतिनिधी पुण्यातील कोथरूड परिसरात हुंड्यासाठी छळ करून १८ वर्षीय विवाहितेची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला…

ByBymnewsmarathi May 12, 2026

लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील २.३८ कोटींचा वेतन घोटाळा उघड

प्रतिनिधी लातूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वेतन वाटप विभागात तब्बल २ कोटी ३८ लाख रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचा धक्कादायक…

ByBymnewsmarathi May 12, 2026

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीकडून निर्घृण खून

प्रतिनिधी हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक…

ByBymnewsmarathi May 7, 2026

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026