• Home
  • क्राईम
  • सेल कंपनीचे काम रोखणाऱ्या कामगारांवर गुन्हा दाखल
Image

सेल कंपनीचे काम रोखणाऱ्या कामगारांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी

कळंबोली येथील सेल कंपनीमध्ये कामगार आणि ठेकेदार यांच्यात मागील दोन महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. लोखंडी माल उचलण्यासाठी लोखंडी चुंबक (मायजॅक क्रेन) सेल कंपनीने आणल्याने माथाडी कामगारांचा याला विरोध आहे. मराठी कामगार सेनेच्या प्रतिनिधींसह या संघटनेच्या कामगारांनी बुधवारी सेल कंपनीतील मायजॅक क्रेनचे काम बंद करण्याचा पवित्रा घेतल्यावर पोलिसांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनी वारंवार सांगूनही कामगार व त्यांच्या प्रतिनिधींनी जमावबंदीचा नियम मोडल्यामुळे कामगार नेते महेश जाधव व इतर ७० कामगारांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कळंबोली येथील सेल कंपनीमध्ये लोखंडी मालाची आवक जावक होते. या लोखंडी मालाची हाताळणीसाठी शेकडो माथाडी कामगार येथे अनेक वर्षांपासून काम करतात. मायजॅक क्रेन आल्यापासून या माथाडी कामगारांचे वेतन ठेकेदाराकडून कमी मिळत असल्याचा आरोप करुन अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार संघटनेतून फारकत घेत अनेक माथाडी कामगारांनी वेतनवाढीच्या आशेने महेश जाधव यांचे नेतृत्व स्वीकारले. महेश जाधव यांचे व राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचे सेल कंपनीच्या माथाडी कामगारांच्या कारणावरुन वाद झाल्याने जाधव यांच्यावर मुंबईला मनसैनिकांनी हल्ला केल्याची घटना घडली.

काही दिवसांपूर्वी जाधव यांनी मनसे सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सेल कंपनीचे प्रकरण चर्चेत आले. पोलिसांनी जाधव यांच्याविरोधात दाखल केलेल्या फौजदारी कारवाईमध्ये कळंबोलीचे पोलीस कामगार नेते जाधव यांना बुधवारी सेल कंपनीमध्ये मायजॅक क्रेनचे काम ज्या कामगारांना करायचे आहे अशा कामगारांना करू द्या इतर कामगारांनी पोलिसांनी लागू केलेला जमाव बंदीचा नियम मोडल्यास कारवाई करू असा इशारा दिला. या इशाऱ्याला न जुमानल्याने ही कारवाई पोलिसांनी केली आहे.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026