• Home
  • इतर
  • बारामतीच्या जागेसाठी कॉंग्रेस गटातून हालचाल. पुरंदर तालुक्यातून राजेंद्र बरकडे इच्छुक.
Image

बारामतीच्या जागेसाठी कॉंग्रेस गटातून हालचाल. पुरंदर तालुक्यातून राजेंद्र बरकडे इच्छुक.

 प्रतिनिधी

एकीकडे बारामती लोकसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली असताना काँगेसच्या महाराष्ट्र ओबीसी सेलकडून मात्र बारामतीच्या जागेसाठी पुरंदरच्या उमेदवाराची निवड करण्यात यावी यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचे चित्र स्पष्ट आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत खासदार पदासाठी बारामतीतून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादीतून सुनेत्रा पवार यांची नावे चर्चेत असली तरी देखील घराणेशाहीच्या संघर्षाला बगल देण्यासाठीच कॉंग्रेसच्या महाराष्ट्र ओबीसी सेलकडून कंबर कसली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यावेळी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून पुरंदरचे राजेंद्र बरकडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी कॉंग्रेस ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयसिंग यादव यांच्याकडे शिफारस केली असून लोकसभेच्या ४८ जागांपैकी ९ जागा ओबीसीला मिळाव्यात अशी मागणी देखील केली आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदार संघात धनगर समाजाचे प्राबल्य असून भाजपच्या ओबीसी सेलकडूनही पणदरेच्या प्रियदर्शनी कोकरे यांना रिंगणात उतरविण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.यापूर्वी सन २०१४ मध्ये महादेव जानकर यांनी धनगर समाजाच्या जीवावर तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडूक लढवून सुप्रिया सुळे यांना कडवे आव्हान देत भाजपची वोट बँक राखली होती. परंतु बारामती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीने कॉंग्रेसला जागा दिल्यास भाजपचा पत्ता निश्चितच कट होणार असल्याचा विश्वास कॉंग्रेस ओबीसी सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे यांनी व्यक्त केला.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025