पाउल महिला दिनानिमित्य आधारवड बालरक्षक सप्ताह मधील अलौकीक कार्य करणाऱ्या बालरक्षक भगिनीचा भावस्पर्श…..*

Uncategorized

प्रतिनिधी.
कोरोनाचा हाहाकार माजला होता शाळा बंद होत्या. आमची टिम भांद्री येथे उन्हाळयाच्या सुट्टीतील गावआराखडा तयार करित होतो. नऊ वाजता कॉल आला ‘ मी शबनम बोलतेय दादा दौंडवरून . मला बालरक्षक चळवळीत काम करायचे आहे आणि काय करता येईल ? ” आज प्रथमतः इंग्रजी माध्यमाच्या कायमविनाअनुदानित शाळेच्या मॅडमचे या कामाविषयी मला विचारणे झाले होते.
घरापासून सात आठ किलोमीटरवर शाळा आणि मध्ये लागणाऱ्या विटभट्टया पण नेहमी सारखे पाहणे आणि समोर जाणे . आज विसपंचवीस मुले विटभट्टीवर काम करतांना दिसली. शबनमताई विटभट्टीवर गेल्या मुलांच्या पालकाशी संवाद साधला पण मुकादम काय म्हणेल याबाबत थोडी भिती होती. जवळच असलेल्या शाळेत पाठवण्यासाठी प्रयत्नही झाले परंतु मुले कुठेतरी हरवून जाईल या भितीने पालक इतरत्र पाठवायला तयार नव्हते बस आता मनात संकल्प केला यांना इथेच शिकवायचे विटभट्टीवर शिक्षक बनून …
जेमतेन पगार असलेला व्यक्ती कसा खर्च करेल पण दृढ संकल्प केला की यश हमखास मिळते. मुलांसाठी पाटया , वहया , जुने पुस्तकाची व्यवस्था केली इतर मित्रांच्या सहाय्याने वस्तु मुलांना पुरविण्यात आल्या .
मुले जाम खूश झाली. काही मुलांचे आधार कार्ड नव्हते ते जिथे शिकत होते तेथे संपर्क करून आधारकार्ड उपलब्ध करून घेतले व काहीना जवळच्या जि.प शाळेत दाखल करून घेतले . मुलांना दाखल करून घेण्यात येणाऱ्या अडचणी यांनाही आल्या . कशासाठी या मुलांना शाळेत टाकता . पोर्टलवर नाव चढवतांना तकलिफ होते . ही मुले इतरासोबत कशी जुळवून घेतील नानाविध प्रश्नाचा भडीमार त्यांच्यासमोर व्हायचा मात्र त्यांनी ठरविले की आता आपण वरिष्ठाच्या मदतीने ही मुले दाखल करायची. त्यावेळेस श्री वनवे साहेब गटशिक्षणाधिकारी दौंड यांनी सहकार्य केले.
काल परवाची गोष्ट एका शाळाबाहय मुलांच्या प्रवेशासाठी गेले असता संबंधित शाळेने प्रवेश नाकारले . कित्येक वेळापासून त्या शिक्षकाला त्या समजावत होत्या परंतु ते ऐकायला तयार नव्हते का तर आधार कार्ड नाही कारण आधारकार्ड नसलेल्या मुलांची नोंदणी करतांना शिक्षकांना खूप अडचन जाते . ताईनी खूप विनवनी केली पण शेवटी अपयश आले आता आधारासाठी धावपळ सुरू झाली . असे संघर्ष करून त्यांनी पन्नासपेक्षा जास्त शाळा मुलांना शिक्षणप्रवाहात आणले . जवळपास तीनसे पेक्षा जास्त गरजू विद्यार्थ्याना त्यांनी शैक्षणिक साहित्य संस्थाच्या मदतीने दिले . दिव्यांग मुलांसाठी त्या स्वखर्चाने अभ्यासगृह चालवतात . त्याचबरोबर त्यांनी दोन मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे .
आज विटभट्टीवर शिकवतांना एका मुलांने म्हटले , टिचर तुम्ही आम्हाला का शिकवता आम्ही तर कामगाराची मुले !’ त्यावर शबनम लाई म्हणाल्या , “तसे नाही , तुम्ही कामगारांची नाही तर मानवांची लेकरे आहात आणि माझा कर्तव्य आहे तुम्हच्यासाठी काहीतरी करणे .
हो मॅडम आमाले खूप शिकायचे आहे कारण नाही शिकले तर बापासारखे विटभट्टीवर काम करायला यावे लागे ..
आम्ही शिकून साहेब बनून आमच्या आईवडीलचे कामाचे ओझे उतरावयाचे आहे !
ताई त्या मुलांकडे पाहतच राहील्या काही न बोलता असे किती मुले असेल ज्यांचे स्वप्न आहे शिकायचे पण परिस्थितीने स्वप्नाना बंदीस्त करून टाकले आहे .
मागील चार वर्षांपासून त्या उन्हातान्हात जावून तप्त वाऱ्याचा मारा झेलत विटभटीवर शिक्षणाचे धडे देत आहेत .
अशा ध्येयवेडया बालरक्षक शिक्षिका शबनम डफेदार याना मानाचा मुजरा
विनोद राठोड
बालरक्षक टिम महाराष्ट्र