• Home
  • क्राईम
  • धक्कादायक! सहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
Image

धक्कादायक! सहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

प्रतिनिधी

एका १२ वर्षीय मुलीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना प्रतापनगर ठाण्यांतर्गत गोपालनगर परिसरात घडली. या घटनेचा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. इतक्या कमी वयाच्या मुलीने गळफास लावल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निशिला संजय बागडे (१२) रा. जोशीवाडी असे मृत मुलीचे नाव आहे.

निशिला सहावीची विद्यार्थिनी होती. तिचे वडील संजय हे टेक्निशियन आहेत तर आई खासगी शाळेत शिक्षिका आहे. सकाळी १० वाजताच्या सुमारास आई-वडील आणि निशिलाची आजी आप-आपल्या कामावर गेले. घरी तिचा ७ वर्षांचा भाऊ होता. दोघांनीही एकत्र बसून चिप्स खाल्ले. ११.३० वाजताच्या सुमारास ऑटो आला आणि लहान भाऊही शाळेत गेला. निशिला घरी एकटीच होती. या दरम्यान तिने घरी हॉलमध्ये छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास लावला. दुपारी दोन वाजताच्या सुमारास आजी घरी परतली असता निशिला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. आजीने आरडा-ओरड केल्याने शेजारी गोळा झाले. आई-वडिलांना घटनेची माहिती देण्यात आली. तत्काळ तिला खाली उतरवून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी मेडिकलला घेऊन जाण्यास सांगितले. मेडिकलच्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

निशिलाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कुटुंबीयांनाही याबाबत कोणतीही माहिती नाही. पोलिसांनी शेजाऱ्यांकडेही विचारपूस केली. सर्वांनी सांगितले की, निशिला अभ्यासात हुशार होती. शाळेत जाण्यापूर्वी निशिलाने लहान भावाला जादू दाखवते असे सांगितले होते. उत्सूकतेपोटी ही घटना घडल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Releated Posts

बारामतीत गुन्हेगारांची गय नाही! सराईत गुंडांवर तडीपारीची कुऱ्हाड; पोलिसांचा कडक पवित्रा

प्रतिनिधी ​दहशत माजवणाऱ्या टोळ्यांचे धाबे दणाणले; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम बारामती शहर आणि तालुक्यात वारंवार गंभीर गुन्हे…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025

बारामतीत पोलिसांचा थरार; धारदार शस्त्रांसह सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

प्रतिनिधी ​दहशत पसरवण्याचा प्रयत्न फसला; पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई बारामती शहर आणि परिसरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रे…

ByBymnewsmarathi Dec 22, 2025

बारामतीत पोलिसांचा ‘महामोहीम’ तडाखा; गुणवडी, जळोचीसह नीरा वागजमधील अवैध धंदे उद्ध्वस्त

प्रतिनिधी ​१५ जणांवर गुन्हे दाखल; ५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त, गावठी दारूचे रसायन केले नष्ट बारामती शहर आणि…

ByBymnewsmarathi Dec 22, 2025

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी: RDX च्या उल्लेखामुळे शहर हादरले

प्रतिनिधी ​कोल्हापूर शहराचे प्रशासकीय केंद्र असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाला आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने थेट ई-मेलद्वारे बॉम्बने…

ByBymnewsmarathi Dec 12, 2025